गोंदिया : तालुक्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्न्यान योजने अंतर्गत आता पर्यंत 63 लोकांनी अर्ज केले आहेत, त्या पैकी 17 प्रस्ताव बँकेतून मंजूर झाले असून 17 प्रस्ताव मंजुरीसठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत तर 10 प्रस्ताव जिल्हास्तरिय समिती कडे सादर असून 22 प्रस्ताव बँकेने नाकारले आहेत.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्न्यान योजने बँक कर्जाशी निगळीत आहे, या मध्ये वयक्तिक लाभार्थी, स्वयंसाह्यता गट, शेतकरी गट, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, सर्वच खाद्य प्रक्रीया उद्योगाचे विस्तारिकारण, आधुनिकीकरण आणि स्थरवृद्धी करता येते, या योजनेत वयक्तिक अनुदान प्रकल्प च्या 35% किंवा 10 लक्ष, गट लाभार्थीना 35%, मार्केटिंग ब्रॅण्डिंग साठी 50% व प्रशिक्षनासाठी 100% अनुदान उपलब्ध आहे.
देवरी तालुक्यातील 17 प्रकल्प मंजूर झाले असून त्या मध्ये पशु खाद्य उद्योग,फ्लोअर मिल्स, मिरची पावडर उद्योग,ऑइल मिल आदी.. प्रक्रीया उद्योग आहेत, तसेच योजने द्वारे मोफत प्रकल्प अहवाल व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे, योजनेत अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवरी,तसेच सर्व कृषी सहहायक व जिल्हा संसाधन व्यक्ती यांच्या कडे अर्ज उपलब्ध करून देण्यात आली आहे, तालुक्यातील सूक्ष्म उद्योग वाढीसाठी या योजनेचा सर्व छोटे उद्योजक, गट व संस्था, शेतकरी कंपनी यांनी लाभ घेवून स्वतः उद्योजक बना असे जिल्हा संसाधन व्यक्ती भौदीप शहारे यांनी केले आहे.