गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑक्टोंबर, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, फुलचुर पेठ, गोरेगांव रोड, गोंदिया येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. ईच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे. इयत्ता १० वी व १२ वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दुरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० यावर किंवा gondiyarojgar@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा.

या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र राजू माटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *