मराबजोब येथील भिवराबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेला चपराक….

गोंदिया (देवरी):-
तालुक्यातील मुरदोली येथील भिवराबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे एका जमिनीच्या वादात उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाखल अपील अखेर जिल्हाधिकारी यांनी दि. 13 रोजी फेटाळली आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील मौजा मरामजोब येथील गट क्र 130 आराजी 0.06 हे आर आणि गट क्र. 131 आराजी 0.76 हे आ. अशी शासकीय जमीन आहे. यापैकी गट क्र. 131 वर 2001 गैरअर्जदार तेजराम दयाराम धुर्वे यांचा 0.2 हे आर जमिनीवर ताबा आहे. याशिवाय गावातील इतर काही व्यक्तींचा 0.2 हे आर प्रमाणे ताबा असून 0.06 हे आर. जमिनी ही खुली आहे. गैरअर्जदार यांचेसह इतर अतिक्रमणधारकांवर महसूल विभागाने 2001-02 मध्ये कार्यवाही करून प्रत्येकी 500 रुपये दंडाची कार्यवाही करून अतिक्रमण नियमित केले. याशिवाय ग्राम पंचायत कार्यालय सुद्धा या लोकांकडून नियमित कर गोळा करीत आहे.

अपिलार्थी भिवराबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने 2010 मध्ये महसूल विभागाकडे भाडेतत्वावर जमिनीची मागणी केली. नूसार महसूल विभागाने गट क्र. 130 व 131 मधील खुली जागा ही संबंधित शिक्षण संस्थेला दिली. मात्र, 2021 मध्ये अपिलार्थीने तहसीलदार देवरी यांचे कडे अर्ज करून गट क्र 131 मधील आराजीच्या दुरूस्ती साठी अर्ज केली. त्यांचा अर्ज मंजूर तहसीलदार देवरीने मंजूर केल्याने संबंधित संस्थेन गट क्र131 मधील संपूर्ण जमिनीवर आपला दावा सांगितला. तहसीलदार देवरी यांचे निर्णयाविरूद्ध गैरअर्जदार धुर्वे यांनी उपवविभागीय अधिकारी देवरी यांचेकडे अपील दाखल करून वास्तविक परिस्थिती शासनाच्या निदर्शनात आणून दिल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांचे आदेश रद्द करून अपिलार्थीच्या गट क्र131 वर 0.06 हे आर वरील ताबा मान्य केला. या निर्णयाविरुद् अपिलार्थी शिक्षण संस्थेने गोंदियाच्या जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात दाद मागितली. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सदर प्रकरणात सर्व पुरावे तपासून अखेर उपविभागीय अधिकारी देवरी यांचा निर्णय कायम ठेवत अपिलार्थी शिक्षण संस्थेचा अर्ज गेल्या 13 तारखेला फेटाळून लावला आहे. या प्रकरणात गैरअर्जदाराची बाजू अॅड. महेश पोगळे यांनी मांडली आहे.

प्रतिक्रीया
या संबधि अजुन पर्यंत कोनतेही चौकशीचे आदेश वरिष्टानीं दिलेले नाहीत. चौकशीचे आदेश येताच जे चौकशीत निष्पन्नं होईल तसाच अहवाल वरीष्ट अधिकार्यांना देन्यात येईल.
अनिल पवार (तहसीलदार देवरी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *