कोरोना नंतर पहिल्यांदाच पंधरा ते विस हज्जार दर्शकांची हजेरी..
गोंदिया(देवरी):-
यंदा गोंदिया जिल्ह्यात ऐकुन ९८ ठिकानी रावन दहन करन्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील देवनगरी म्हनल्या जानार्या देवरी शहरात कला संस्कृती धर्म अध्यात्म परंपरा सोबत संस्काराचे अंगीकार करून नवीन पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संदेश देण्यासाठी सतत सहा वर्षापासून देवरी शहरातील चिचगड रोडा लगद असलेल्या नगरपंचायत क्रिडांगण येथे देवरी दशहरा उत्सव समितीच्या वतीने भव्य ६५ फुट उंचिच्या रावणाचे दहन पंधरा ते विस हज्जार नागरीकांच्या उपस्तीत रात्री ८.३० वाजता करन्यात आले.

५ ऑक्टोंबर गुरुवार रोजी दुपारी ०३:०० वाजता पासुन मॉं धुकेश्वरी मंदीरातुन भव्य झाकी देखावा काढन्यात आला. संपुर्ण देवरी शहरातील नागरीकांना कोरोना नंतर दशहेरा उत्सवाचा आनंद घेताना बघायला मिळाला. सायंकाळी ७.०० वाजता संपुर्ण झाकी शहर परिभ्रमन करुन रावन दहन ठिकानी पोहचत हनुमानाच्या वेशभुशेत असलेल्या हनुमानाने लंकां पेटवली व रामाने रावण दहन केले . देवरी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने दसऱ्याच्या पर्वावर अनितीचा व अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्षाची प्रतीक म्हणून हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने हजेरी लावली होती. या करिता दशहरा उत्सव समितीच्या वतिने नगरपंचायतच्या संपुर्ण मैदानात नागरींकासाठी परिपुर्ण तयारी करन्यात आली होती.

या भव्य दशेहरा उत्सवाच्या नियोजना करीता दशहरा उत्सव समितीची संपुर्ण टीम कार्यरत होती. रावण दहन उत्सवात विशेषता अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर व देवरी पोलिस्टेसनचे ठानेदार रेवंचद सिंगनजुडे यानीं हजेरी लावली होती. त्यात आफताब शेख , पारस कट्टकवार, काक्के (रतनदिप)भाटीया, सचिन बावरीया, रितेश अग्रवाल, अनिल येरने, श्यांखी भाटीया, यादोभाऊ पंचमवार, प्रविन दहीकर, विजय गहाने, अँड.भुसन मस्करे, हमिद मेमन, अँ.पुष्पकुमार गनबोईर, अनशुल अग्रवाल, गोपाल तिवारी, सुरेश शाहु, अमित गुप्ता , युवराज मेश्राम, आशिष आंबिलकर, रोहीत जैन, रितरेश अशाटी, विनोद गभने, राजु शाहु आधी कडे विविध जबाबदारी सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडत उत्तम प्रकारे रावण दहनाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले. संपुर्ण रावन दहन कार्यक्रमात पोलिस प्रशानाचेही मोलाचे सहकार्य राहीले.