गोंदिया:-
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना चालु शैक्षणिक सत्र 2022-23 करिता शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरु झाले आहे. महाविद्यालयात दहावीनंतर प्रवेश घेतलेल्या सर्व अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह अपलोड करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
विद्यार्थ्यांनी ते अपलोड करुन अर्ज तातडीने भरुन घ्यावे, असे आवाहन देवरी एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी विकस राचेलवार यांनी केले आहे. या शिष्यवृत्तीचे फार्म अपलोड करण्यासाठी mahadbtmahait.gov.in हे पोर्टल सुरु झाले आहे. महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थी अर्ज सादर करु शकतात, अशी माहीती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिली आहे.

शैक्षणिक सत्र 2019-20, 2020-21, व 2021-22 मधील शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपचे अनेक पात्र अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी प्रकल्प कार्यालयाकडुन महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना पत्रव्यहार व्हॉटअपच्या माध्यमातुन तसेच फोनव्दारे वारंवार कळविले जात आहे. एवढेच नाही तर शिष्यवृत्ती हाताळणाऱ्या लिपीकांना या संदर्भात कळवुनही सन 2019-20 मधील 26, सन 2020-21 मधील 6 व 2021-22 मधील 51 अर्ज महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित आहेत. संबधित महाविद्यालयांनी तपासणी करुन पात्र अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या लॉगीनवर सेंड करावेत. महाविद्यालयातील लिपीकांनी विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्तीचे तसेच फ्रिशीपचे अर्जाची व आवश्यक सर्व कागदपत्राची ऑनलाईन तपासणी करणे व प्रकल्प कार्यालयाच्या लॉगीनवर अर्ज सेंड करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीचे परिपुर्ण प्रस्ताव मुदतीत सादर न झाल्यास व शासनाकडुन पोर्टल बंद करण्यात आले तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासुन वंचित राहावे लागेल त्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहनार असल्याचेही विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
देवरी यानीं सागींतले आहे.