कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली मदत…
कुटुंबीयांच्या मदतीसाठी आव्हान…
गोंदिया : अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या संकल्पनेतून 'एक काम वतन के नाम' या सामाजिक उपक्रमांतर्गत देवरी शहरातील 40 गरीब कुटुंबियांचे घरे अतिवृष्टीच्या फटक्यांने जमीनदोस्त झाले होते. सामाजिक क्षेत्रात विविध लोकाभियोग उपक्रम राबवून नागरिकांना सहकार्य करत असतात. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी राबविलेले "एक काम वतन के नाम" या उपक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथील प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ह्या उपक्रम साध्य करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन निधी गोळा करुन प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना यांना सुपुर्द केला.
देवरी शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागातील गरीब कुटुंबियांच्या घरात पाणी शिरून शेकडो नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या झालेल्या अतिवृष्टीमुळे हातावर पोट भरत असणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. घरातील अन्नधान्याची यात नासाडी झाली. यातील अनेक कुटुंबे कमकुवत आर्थिक गटातील असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली होती. घरातील साहित्या-बरोबरच मुलांच्या शैक्षणिक साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देवरी शहरातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या त्या ४० कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत व्हावी याच उद्देशाने अपर पोलिस अधिक्षक असोक बनकर यानीं “एक काम वतन के नाम” या उपक्रमाची सुरूवात केली.
शहरातील एका लेकीने स्वःताच्या गुल्लकातील खाऊकरीता वाचवीलेल रुपये दान करुन ‘एक काम वतन के नाम’ उपक्रमाला सुरूवात केली होती. त्या लेकीची सामाजीक बांधीलकीची प्रेरणा घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील आम्ही सर्व कर्मचारी त्या ४० कुटुंबाना मदत करण्याकरीता एकत्र निधी गोळा करत मदत केले. नागरीकांनी समोर येण्याचे आव्हान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथील प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यानीं केले आहे.