गोंदिया : जिल्हयात डेंग्यू, हिवताप रुग्ण संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता संपूर्ण जिल्हयात १७ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत डेंग्यू, हिवताप व ईतर किटकजन्य आजाराविषयी जनजागृति होण्याच्या दृष्टीने विशेष सर्वेक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आल आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सदर मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. सदर मोहिमेमध्ये १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण कंटेनर सर्वे, ताप सर्वे, गृहभेटीदरम्यान कंटेनर सर्वेक्षण करुण दूषीत कटेनर मध्ये अळीनाशक टेमीफास टाकने तसेच दूषीत कंटेनर घरमालकांना दाखवून रिकामे करण्याचे काम या मोहिमेमध्ये केले जाणार आहे. २० आक्टोबर रोजी संपूर्ण जिल्हयात सामूहिक कोरडा दिवस पाळला जाणार आहे. तसेच २१ आक्टोबर रोजी डासोत्पत्ती स्थानामध्ये सामूहिक गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही आरोग्य कर्मचाऱ्याकडून केली जाणार आहे.

कोणताही ताप हिवताप असू शकतो व लवकर निदान तात्काळ उपचार या उक्ती प्रमाणे ताप आलेल्या रुग्णाचे हिवतापाकरीता रक्त नमूणे घेऊन तात्काळ निदान आरडीके किट दवारे केले जाणार आहे. डेंग्यू, हिवताप आजारापासून बचाव करण्याकरीता आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा म्हणजे घरातील पाण्याची सर्व भाडी घासून पूसून कोरडे करुण ठेवायचे ड्रम, कूलर पाण्याच्या टाक्या, रांजन, माठ, फूलदान्यातील साचलेले पाणी रीकामे पडलेले टायर नारळाच्या करवंटया यासारख्या टाकावू वस्तूमध्ये पाणी साचू दयायचे नाही जेणेकरुण डासांची उत्पत्ती होणार नाही.

झोपतांन नियमित मच्छरदानीचा वापर करावा, शौचालयाच्या व्हेंट पाईप ला जाळी बांधावी, ताप आल्यास जवळच्या दवाखाण्यात जावून तात्काळ रक्त तपासनी करुण उपचार घ्यावा. कोणताही ताप अंगावर काढू नये व घराबाहेर साचलेल्या पाण्यामध्ये गाडीचे जळालेले इंजीन ऑइल टाकण्याबाबद माहिती दिली. तसेच जनतेच्या सहभागानेच किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे डॉ चौरागडै म्हणाले. याकरीता आरोग्यविभागाकडूण सूरु असलेल्या डेंग्यू सर्वेक्षण शोध मोहिमेला जनतेनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *