सोलापूर : मौजे चौभेपिंपरी ता .माढा येथे झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अशा वेळेस शेतकऱ्यांना दिलासा म्हणून चौभे पिंपरी गावचे सरपंच “लाथ घालाल तिथं पाणी काढणारे; असे कर्तुत्वान
सरपंच विक्रम दादा उरमोडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली, यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचे वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे सरपंच हा गावापुरतं मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या हक्काचा माणूस आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या दुःखात सामील होणारा असा हा सरपंच आहे पण चौभे पिंपरी चे सरपंच विक्रम दादा उरमोडे हे एक वेगळे सरपंच आहेत गावातील नागरिक हा मतदानापुरता मर्यादित नसून तो कायमस्वरूपी आपला माणूस आहे या दृष्टिकोनातून सरपंच यांनी लोकांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली व याच्यावरती काहीतरी मार्ग निघेल असे शेतकऱ्यांना आव्हान दिले ,
प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर