गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही…
गोंदिया(देवरी):-
शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत. गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही. धान कापणीच्या हंगामात तर चक्क शेतकऱ्यांना कुटुंबासह राबण्याची वेळ येते. आता यावरही मात करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कमी वेळात आणि मोजक्या मजुरांत धान कापणी करणारे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथील अरविंद शेन्डें यांनी आपल्या शेतात यांत्रिक पद्धतीने कापणी सुरू केली. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी आता परिसरातील शेतकरी येत असून, इतर शेतकऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.
कापणी करावी, तर मजूर टंचाईचा सामना प्रत्येक शेतकऱ्याला करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागांतर्गत महाडीबीटी योजनेंतर्गत योजना सुरू केलेली आहे. यात उत्साही व होतकरू शेतकरी सहभाग नोंदवित असून, स्वतःचा व शेतीचा विकास साधत आहेत. महाडीबीटी अंतर्गत कापणी यंत्र खरेदी करून स्वतःच्या शेतात धान कापणी करीता शेतकर्यारी उपयोग घ्यायला पाहिजे. इतर राज्यांतून व जिल्ह्यातून मोठे धान कापणी, मळणी यंत्र शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर आहेत, परंतु चोहीकडे धान कापनी सुरू असल्याने कामगार मिळेनासे झाले आहेत. अशा कठीण प्रसंगात धान कापणी यंत्र सोयीचे झालेला आहे. अगदी सरळ रेषेत धान कापला जाऊन बांधणीसाठी सुलभता मिळत आहे.
प्रतिक्रीया
धान कापणी यंत्र सुलभ आहे. एकराला दोन लीटर पेट्रोल लागतो. एका दिवसात तीन ते पाच एकरांतील धानाची कापणी होते. काही बिघाड झाल्यास गावातील दुचाकी दुरुस्त करणारा व्यक्ती ही मशीन दुरुस्त करू शकतो. कृषी विभागामार्फत महाडीबीटी योजनेने ही मशीन खरेदी करता येते. यदा माझ्याकडे 4 एकरांत लागवडीखाली आलेला आहे. एका एकराला कापणीच्या खर्चात १ हजार रुपयांची बचत शक्य आहे.
अरवीन्दं शेन्डे, प्रगतशील शेतकरी भर्रेगाव