“ब्लॉसम” कार्यक्रमात सहभागी व्हावे – प्रकल्प अधिकारी विकाश राचेवार
गोंदिया:– आदिवासी क्षेत्रामध्ये लहान बाळांपासून तर वयोवृद्ध व्यक्ती व्यक्तींवर त्यांची तपासणी करून त्यांच्या रोगांचे निदान करून त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्या करिता “ब्लॉसम” या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे भारत सरकारच्या माध्यमातून आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह, लभान धारणी देवरी तालुक्यातील धामदीटोला, सुकळी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धमदी टोला या पाच गावाची निवड शासनाने केलेली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचा सर्व करून त्यांची सर्वांची माहिती घेऊन सर्वांचं आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यांचे निदान करण्यात येईल व असणाऱ्या रोगांवर उपचार सुद्धा करण्यात येईल. यामध्ये हे पाचही गाव ज्यामध्ये 80 टक्के पेक्षा जास्त आदिवासी आहेत अशांची निवड शासनाने केलेली आहे. त्यामुळे पाचही गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांनी या “ब्लॉसम” कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकाश राचेवार यांनी केलेले आहे.
दिनांक 11 नोव्हेंबर ला मुरकुंडह येथे प्रथम शिबिर आयोजित केलेले आहे. त्यानंतर येणाऱ्या काही दिवसांमध्ये उर्वरित गावांमध्ये हे शिबिर आयोजित केल्या जाणार आहे. यामध्ये डॉक्टर दिलीप गोडे हे या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक असून वैद्यकीय अधिकारी म्हनुन डॉ.दिलीप गोडे (नाशिक), डॉ.अजित सॉवजी (नागपुर), डॉ.शिल्पाहजारे(नागपुर),डॉ.अमित जोगडान्डें (गोंदिया), डॉ.किरण तवालरे (नागपुर), डॉ.सचिन खातरी(नागपुर) ,डॉ.कल्पना तवालरे (नागपुर) यांचा विशेष सहभाग राहनार आहे.
या कार्यक्रमात आदिवासी विकास विभाग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, एम एस आयुर्वेदिक कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेज जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व टीम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे सर्व प्रशिक्षित विद्यार्थी इत्यादी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे या पाचही गावातील आदिवासी बांधवांना सेवा देण्याकरिता व त्यांचे नियोजन करण्याकरिता दिनांक 04 नोव्हेंबरला एम एस आयुर्वेदिक कॉलेज येथे सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे साहेब, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुतार साहेब प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार , सा. प्रकल्प अधिकारी मिश्रा ,आरोग्य विद्यापीठ नाशिक चे डॉक्टर दिलीप गोडे, डॉक्टर सावजी ,डॉक्टर हजारे ,डॉक्टर खत्री, संबंधित पाचही गावाचे आशा वर्कर अंगणवाडी सेविका वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी हे प्रशिक्षणाला उपस्थित होते.