मुन्नाभाई नंदागवळी यांचे प्रतिपादन : इंजोरी येथे लावणीचे उद्घाटन
माणसाची उन्नती का होत नाही, कारण माणूस हा शिक्षणापासून कोसोदूर राहतो, शिक्षण घेतले नाही तर माणूस आणि त्याचा समाज हा विकासाला मुकतो, समाजातील घटक हा विकसित होत नाही, म्हणून माणसाची मानसिक गुलामी चिकटून राहते, अशा गुलामीला लाथ मारुन तरुण वर्गानी उच्च शिक्षित व्हावे आणि महामानवांचे विचार तळागाळातील समाजात पेरतील तरच क्रांती होणार असे खळबळजनक सुचक विधान प्रतिपादन आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. ते नाट्यप्रयोगाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी नाटकाचे उद्घाटन म. पो. से. देवरीचे घनश्याम मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रभाकर दहिकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे- रविंद्र खोटेले, रुतन लोणारे, एकनाथ मुनेश्वर, विनय खोटेले, प्रकाश चुटे, चुन्नीलाल शेंडे, पवन बहेकार, रणजित मेश्राम, संतोष मेंढे, लिलेश्वर बनकर नरेश शेंडे अलंकार राखडे हेमंत फुंडे नेपाल मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी छत्रपती राजे शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांनी फित कापून लावणी कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन केले. दरवर्षी प्रमाणे ठरलेल्या दिनांक ११-११-२०२२ ला सर्वोदय नाट्य कला मंडळ इंजोरी येथे ए-वन लावणी समुहाचे सादरीकरण करण्यात आले.
या सोहळ्याप्रस़ंगी काही निवडक मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढे नंदागवळी म्हणाले- सदर गावात तरुण वर्ग हा समाजाचा एकोपा निर्माण करतो, पण गावातील काही समाज कंटक हे गावातील वातावरण बिघडवतात. या सर्वांची परवा न करता तरुणांनी उच्च शिक्षित होऊन आपली मनगटाच्या जोरावर समाजात विचार पेरण्याचे काम मात्र युवा वर्गच करेल आणि क्रांती घडून येणार असा विश्वास यानिमित्ताने आपल्या वाणीतून व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खोटेले यांनी करून आभार अरुण मेंढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सभासदांनी चांगली मेहनत घेतली.
गोंदिया