तुळजापूर प्रतिनिधी :- लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीने विकसित केलेले नवे ग्रामीण संपत्ती व्यवस्थापन ॲप हे ग्रामीण भागात वाढत चाललेल्या आर्थिक विकासाची गती वाढवण्यास
उपयुक्त ठरेल असा विश्वास मल्टीस्टेटचे माजी अध्यक्ष, लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी तुळजापूर येथे बोलताना व्यक्त केला. नव्या सुधारित ॲपच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे आणि लोकांना डिजिटल माध्यमातून आपल्या आर्थिक व्यवहाराची माहिती घर बसल्या तसेच 24 तास हवी आहे. ती देण्याचे काम करून मल्टीस्टेटने आपण नव्या बदलासोबत चालणार आहोत हे दाखवून दिले आहे असे रोहन देशमुख म्हणाले.


लोकांनी या सुधारित ॲपचा वापर करावा आणि आपले आर्थिक मान सुधारावे तसेच येत्या भविष्यकाळात मल्टीस्टेटकडून अशाच नव्या सुविधा उपलब्थ करून दिल्या जातील त्यांचाही लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. हा कार्यक्रम मल्टीस्टेटच्या तुळजापूर विभागीय कार्यालयात पार पडला.
उस्मानाबाद येथे लोकमंगलच्या वतिने सामुदायिक सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अधिकाधिक गरजू इच्छुक वधू वरांनी आपली नावे नोंदवावीत असेही आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला चेअरमन पंडित लोमटे, व्हाईस चेअरमन बालाजी शिंदे, संचालक शिवाजी पाटील, शीतल शहाणे, सचिन अडगळे, रामदास कोळगे, विक्रम देशमुख, प्रभाकर मुळे, शाम पाटील, अनिल काळे, रामदास कोळगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तुळजापूरचे भाजपाचे कार्यकर्ते, ठेवीदार, सभासद, कर्जदार, सल्लागार तसेच लोकमंगल मल्टीस्टेट चे सीईओ प्रशांत आंबोरे, संतोष माळी, बालाजी पाटील, सागर देशमुख, विनोद देवकर यांच्यासह सर्व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *