उस्मानाबाद : उमरगा लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित कूनर्जी इंडस्ट्रीज या कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती व वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते तथा माझी उपमुख्यमंत्री ना .अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .२० रोजी संपन्न झाला . यावेळी कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार व क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती .


माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना .अजितदादा पवार हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता उमरगा लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथेनॉल निर्मिती व वीज निर्मिती युनिटचे भूमिपूजन कारखान्याचे चेअरमन प्रा.सुरेश बिराजदार, क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी श्री पवार यांनी कारखान्याच्या कामकाजाची पाहणी करून क्षमता वाढीच्या कामकाजाचा आढावा घेतला .भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना क्युनर्जी इंडस्ट्रीजला भाडेतत्त्वावर दिल्यानंतर अल्पावधीत कारखान्याने प्रगती साधत कारखान्याची गाळप क्षमता तर वाढवलीच आहे . त्यासोबत परिसरातील कारखान्यांपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव दिला आहे. नुकताच उमरगा येथे भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी भाऊसाहेब बिराजदार कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासह इथेनॉल निर्मिती व वीज निर्मिती युनिट उभारणार असल्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महिनाभरातच सदरील इथेनॉल निर्मिती व वीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले .
सदरील प्रकल्प उभारल्याने पूर्वी दिलेल्या सर्वाधिक भावापेक्षा आणखीन जास्त भाव शेतकऱ्यांना मिळेल व परिसरातील उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासह बेरोजगारांनाही कामाची संधी उपलब्ध होईल यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्न करत आहे . अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा . सुरेश बिराजदार यांनी दिली आहे .
यावेळी कारखान्याचे प्रभारी जनरल मॅनेजर बी .जे.पाटील, चीफ केमिस्ट एस.बी.पांढरे , चीफ इंजिनियर ए .एम.कोळगे, यांच्यासह परिसरातील शेतकरी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

सचिन बिद्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *