सावनेरमध्ये आम आदमी पारटीचे वीरूगिरी
सावनेर: सावनेर शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन खासगी कंपनीकडून
केले जात आहे. हे काम त्वरित थांबवावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदनदिले. मात्र, त्यावर काही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही शेवटीयाकडे पालिका प्रशासनाचे लक्षवेधण्यासाठी आम आदमी पार्टीचे
नागपूर जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर आणि तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी गांधी चौकातील नगरपरिषद कार्यालयाजवळील
पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी केली.सावनेर नगरपरिषदने चतुर्थ वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम खासगी कंपनीला दिले आहे मालमत्तांचे फेरमूल्यांकन रद्द करण्याच्या करण्यात यावी अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष गजानन चौधरी, जामुवंतवारकरी, दिनेश मछले,अन्सार भाई, शुभम बोबडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.