section and everything up until
* * @package Newsup */?> जव्हार आमसभा ठरली वाद ग्रस्त,आमसभेत राडा | Ntv News Marathi

तब्बल ५तास चालली सभा,अर्ध्यावरच डाव मोडला

आमदार भुसारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कान टोचले

आमदार भुसारांकडून आश्वासनांची खैरात

लोकप्रतिनिधींचाच राढा

भरत गवारी,जव्हार
दि.२५ फेब्रुवारी २०२३.

जव्हार तालुक्याची पंचायत समिती मार्फत घेण्यात येणारी जव्हारची वार्षिक आमसभा शहरातील साई महल येथे शुक्रवारी नुकतीच पार पडली. हि आमसभा तब्बल ९वर्षानंतर प्रथमच घेतली गेली.गेल्या काही वर्षांपासुन कोरोना महामारीने हि आमसभा लांबणीवर पडली होती.माञ आमसभेला आता मुहूर्त मिळाल्याने हि आमसभा विशेष गाजली. आमसभेत शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत,त्यांना एकञ घेत जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांना आमदारांनी वाचा फोडली. सर्व शासकीय विभागवार जनतेने प्रश्न मांडले.त्यामुळे हि सभा जनतेच्या हक्काची ठरली.आमदार भुसारांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत आश्वासनांची खैरात केली. माञ ह्या आमसभेत तालुक्याच्या कामांसाठी आणलेल्या विकास निधीच्या श्रेयवादापोटी आमदार सुनिल भुसारांच्या अध्यक्षेतेखाली झालेली आमसभा जव्हार तालुक्यात वादग्रस्त ठरल्याचे चिञ पाहावयास मिळाले.आमसभा तहकूब होताच काही क्षणातच भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमसभेतील अहवालाचे लेखापरिक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालुन गदारोळ माजवल्याने हि आमसभा वादग्रस्त ठरली.ह्या गदारोळाला राजकीय रंग चढला होता,यावेळी चिञिकरण करणाऱ्या पञकारांवरही कार्यकर्त्यांनी हात उचलल्याने सबंधित वातावरण चांगलेच तापले होते.आमसभेत विधानसभा आमदार भुसारांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आदिवासी बांधवाचा विश्वास संपादन केला तर एका बाजूने आमसभेत व्यासपीठावरील पंचायत समितीचे सभापती सौ.विजया लहारे ,यांच्याशी जलजीवन मिशन योजनेच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीने आमंत्रण न दिल्याने आमसभेत भुसांरानी योजनेच्या निधीच्या श्रेयवादाने हुज्जत घालत शाब्दिक बाचाबाची झाली.त्यामुळे आमसभेत व्यासपीठावरील सभापतींचा अपमान झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सभा त्याग केला.एकंदरीत हि आमसभा कोणत्याही राजकीय पक्षाची नसली तरी सभेला वेगळे वळण लागल्याने हि सभा वादग्रस्त ठरत अर्ध्या वरच तहकूब करण्याचा धक्का दायक प्रकार जव्हार शहरात पाहावयास मिळाला.हि सभा ५ तास चालली.आमसभा बरखास्त झाल्याने सर्वसामान्य जनतेचा हिरमोड झाला.


जव्हार आमसभेची सुरुवात अध्यक्ष आमदार सुनिल भुसारा,सभापती विजया लहारे यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन दिपपुजनाने झाली.कोरोना काळात वीरमरण प्राप्त झालेल्या अधिकारी ,नेत्यांना श्रध्दांजली अर्पण करत राष्ट्रगीताने आमसभेला प्रारंभ झाला.सभेचे प्रस्ताविक आमसभेचे सचिव पंचायत समिती गटविकास अधिकारी समिर वठारकर यांचे हस्ते झाले.जव्हार तालुक्याच्या आमसभेची खरी सुरूवात महावितरण विभागाने झाली.महावितरणचा तालुक्यातील सावळा गोंधळ पाहता ग्राहकांच्या अडचणी ,ग्राहकांना वाढीव वीज बिल,ग्रामीण भागात वीज जोडणी वाढवा,जुने विद्युत पोल बदला,कौलाळे,नवापाडा,आहिरा,कुतरविहिर या ठिकाणच्या १५० लोकांना अद्यापही विजपुरवठा झालेला नाही,कौलाळे व नांदगाव हि जव्हार तालुक्यात गावे येत असुन सुध्दा त्यांना मोखाडा येथुन वीज पुरवठा केला जात आहे.तसेच न्याहाळे बुद्रक मध्ये,१६ पाडे येत असुन चामिल पाडा,नडगेमोह,न्याहाळे बुद्रक या ३ गावांचेच पथदिवे महावितरण ने का काढले? यासारख्या प्रश्नांची सरबती करत महावितरण आधिकांऱ्या चांगलेच धारेवर धरले.महावितरण ला काही फंडिग लागले तर आमदारांकडुन भावी तरतूद केली जाईल असे आमदार भुसारांनी सांगितले. यानंतर आमसभेत दुसरा विषय जव्हार पतंगशहा रुग्णालयाचा घेतला गेला.त्यात रुग्णालयाचा आढावा,आरोग्य व्यवस्थेच्या सोयी सुविधा,स्ञी रोग तंज्ञ डाँ.अनिता पाटील,रुग्णालयात पाण्याची टंचाई ,सोनोग्राफी मशिन,डेंटिस्ट,शववाहिका,रुग्णवाहिका १०८नं यासारख्या विषयांवर जनतेने प्रश्न मांडले.मृताच्या नातेवाईकांना शववाहिका हि विनामूल्य असुन आमदारांनी जनतेसमोर हे जाहिर केले.


आमसभेत कृषि अधिकाऱ्यांचा विषय हि चांगलाच गाजला.कृषि कार्यालयात संबधित कर्मचारी हे वेळेवर हजर नसतात,इंटरनेट अभावाचा बहाणा सांगून योजनेच्या लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात,पाँवर व्हिलर,शेततळे,आत्मा अंतर्गत मस्यबीज योजना,हळद लागवड,कृषी योजनांचा खर्च या विषयांवर जनतेच्या प्रश्नोत्तरांने सबंधित अधिकाऱ्यांची बोलती बंद केली.तसेच,कामचुकार कृषी अधिकारी वसंत नागरे यांची बदली करा अशी ठराव आमदारांनी घेतला.तसेच,वनविभागावर हि जनतेने प्रश्न उपस्थितीत करत ताशेरे ओढले.मजूर ,रोजगार सेवकांचा गृप बनवून आमदारांचा हि नंबर समाविष्ट करण्याचे विभागाला सुचित केले.यावेळी मध्यान्ह भोजना अंतर्गत जव्हार तालुका वंचित असल्याचा विषय चांगलाच गाजला.परिवहन मंडळा विषयी तालुक्यातील बस फेऱ्या,जनतेच्या अडचणी,गावांना पिकअप शेड ५ लाखाचे द्या,पुरातन मंदिरांची दुरुस्ती, बाळकापरा मंदिरासाठी २५ लाख रुपये देणार असल्याचे आमदारांनी सुचित केले.तसेच,आमसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यात काय कामे केली? गेल्या वर्षी ३९ कोटींची रस्त्याची कामे झाल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली.रस्त्याच्या सरंक्षक भिंती,वनविभागाची रस्त्यांना अडचण, ४१ पूलांना मंजुरी हवी ह्या प्रश्नांवर चर्चा झाली.
आमसभेच्या शेवटी जव्हार नगरपालिका प्रशासनाची खरडपट्टी काढत मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांना आमदारांनी चांगलेच झापले.जव्हार नगरपरिषदेने स्वयंमरोजगार करणाऱ्या शिलाई काम करणाऱ्या बेरोजगार महिलांना नगरपालिकेकडून गाळा खाली करायला नोटीस बजावल्याने आमदारांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कानउघडणी केली. महिला रोजगार करुन स्वतःच्या पायावर उभ्या राहु पाहतात.हे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना बघवत नाही का? अशा टोला आमदार भुसारांनी आमसभेत लगावला.त्याच बरोबर खडखड योजनेचे निकृष्ट काम,रस्त्यांची खोदाई,जांभूळविहिर पूर्व पश्चिम मध्ये,पाण्याची टंचाई,परिसरातील वाढते अतिक्रमण हे विषय गाजले. आमसभेत सभापती बरोबर शाब्दिक बाचाबाची झाल्याने सायंकाळी ७ वाजता सभा तहकूब करुन पुढील राहिलेले विषय पुढच्या सभेत घेण्याचे आमदार भुसारांनी सुचित करत राष्टगीताने आमसभेची सांगता झाली.

आमसभेत आमदारांचा थाट
जव्हार तालुक्यातील जनतेचा लोक प्रतिनिधी,सेवक ह्या नात्याने राजकीय हेवेदावे दूर ठेवत जनतेच्या प्रश्नांना आमदार भुसांरानी सर्वसामान्यांना आमसभा प्रश्नोत्तरांना खुली केली होती.त्यामुळे सामान्य जनतेला ही आमसभा आपली वाटली.हि आपुलकी आमदारांनी जपली होती. परंतु केवळ तालुक्याच्या विकास निधीपायी आमसभेला काळिंभा लागणे हे लोक प्रतिनिधींना शोभत नाही. आमदार विकास निधीचे श्रेय लाटण्यापायी सभेतील जलजीवन मिशनचे अधिकारी यांचा बाप काढणे, शिवाय त्या अधिकाऱ्यांची आमसभेत जात विचारणे. हे आपला हक्काचा माणुस आमदार सुनिल भुसारा यांना कसे पटले हेच कळत नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अहोराञ झटणारे आमदार भुसारा यांच्या कडून असे घडेल असे जव्हार तालुक्याच्या जनतेला कधी वाटलेच नव्हते. त्यामुळे आमदारकीची छाप आमसभेत असल्याचे चित्र जनतेला पाहायला मिळाले.

आमसभेत जवळच्या नेत्यांची भाऊगर्दी
जव्हारच्या आमसभेत व्यासपीठावर आमदार भुसारांच्या निकटवर्तीयांची भाऊ गर्दी पाहायला मिळाली.व्यासपीठावर काही तुरळक अधिकाऱ्यांबरोबर राजकीय नेते ही पाहायला मिळाले. आमसभेच्या सुरुवातीला उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.परंतु शहरातील शिवसेना पक्ष ठाकरे गट,शिवसेना शिंदे गट, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना या कार्यकर्त्यांना सबंधित आमसभेला उपस्थित न राहण्याचे वावडे ठरले.त्यामुळे राजकीय पक्षाच्या भेदामुळे आमसभेचे राजकीय चित्र चव्हाट्यावर आले.

आमसभेत कोणते ठराव मंजूर
तहसिल कार्यालयात पञकारांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती, जव्हार नगरपरिषदेला वैकुंठ रथ मंजूर , कापरी पाडा सरंक्षक भिंतीचा ठराव,डहाणू -जव्हार रेल्वे मार्ग सुरु करण्याचा ठराव, तालुक्यातील शासकीय कार्यालयांना बायोमंँट्रीक मशीन बसविण्याचा ठराव आमसभेत घेण्यात आला.

“तालुक्याची आमसभा माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच होती.शासकीय अधिकारी म्हणून आमसभेचे सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर होती”.
—– श्री.समिर वठारकर.गटविकास अधिकारी पंचायत समिती,जव्हार.

"आमसभेत विकास निधीचे श्रेय लाटण्यापायी,वाद घालुन महिला सभापती ,लोकप्रतिनिधी,अधिकारी यांचा भर सभेत अपमान करणे आमदारांना शोभत नाही."

—- सौ.विजया लहारे,सभापती जव्हार पंचायत समिती.

“आमसभेत गैरहजर असलेले शासकीय अधिकारी, पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य,मुदत संपलेले नगरसेवक आमसभेला गैरहजर असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल”.

—– आमदार.सुनिल भुसारा, विक्रमगड विधान सभा.

“सरकारी शासकीय विभागाची कामे करताना सरकारी अधिकाऱ्यांना कायद्याची बंधने असतात.लोकप्रतिनिधीं सारखा फक्त ५ वर्षाचा कार्यकाल संभाळून जनतेची आपुलकी संभाळावी लागत नाही.त्यामुळे अधिकारी वर्गाला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागते.”

—-आशा तमखाडे,तहसिलदार जव्हार,जि.पालघर.

जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं.*8408805860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *