section and everything up until
* * @package Newsup */?> खासदार राजेंद्र गावित यांची पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पालघर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या बाबत चर्चा | Ntv News Marathi

पालघर लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालघर लोकसभा खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार मिश्र व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पश्चिम रेल्वे मुख्यालयात चर्चा केली. यावेळी प्रमुख मुख्य परिचालन प्रबंधक, प्रमुख मुख्य वाणिज्य प्रबंधक, मंडळ रेल्वे प्रबंधक, मुंबई यांच्यासह अनेक पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नायगाव ते घोलवड दरम्यानच्या विविध रेल्वे समस्यांवर खासदार गावित यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी DFCC व MRVCC ह्या प्रकल्प बधितांना एका गावात एक सर्वे गट नंबर करिता समान दर द्यावा अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. जव्हार येथे पोस्ट ऑफिस रेल्वे आरक्षण सुविधा सुरू करण्यात यावे, यामुळे जव्हार, विक्रमगड, मोखाडा यासारख्या भागातील नागरिकांना रेल्वे आरक्षण करणे सोयीस्कर होईल.

पालघर जिल्ह्यातील शेतमाल तसेच मासे उत्तर भारतात पाठविण्यासाठी योग्य उपाय योजले जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने खासदारांना सांगितले.
पालघर डहाणू मधील चिकू, पान, मासे, भाजीपाला, इतर फळे ह्या करीता स्पेशल पार्सल ट्रेन उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.

डहाणू उपनगरीय भागातील रेल्वे सेवा अनियमित असतात. लोकल गाड्या २० ते ३० मिनिटे बाजूला काढून ठेवण्यात येतात. यामुळे कामगार वर्ग तसेच महत्वाचा कामासाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होतो. याबाबत खासदार महोदयांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. डहाणू उपनगरीय सेवा बाजूला काढू नये. डहाणू उपनगरीय गाड्या वेळेवर धावल्याच पाहिजेत, याबत कुठलीही हयगय मी सहन करणार नाही, असा इशारा खासदारांनी रेल्वे प्रशासनास दिला. याची गंभीर दखल महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार मिश्र यांनी घेतली असून डहाणू उपनगरीय लोकल ट्रेन नियोजित वेळ वर चालवण्यासाठी सर्व काळजी घेणार असल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले.


सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी डहाणू विरार लोकल तात्काळ पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. तसेच विरार ते डहाणू भागातील रेल्वे सेवेचे नियंत्रण हे वलसाड नियंत्रण कक्षातून होत असून वलसाड नियंत्रण कक्ष या भागातील वाहतूक नियोजन करण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. त्यामुळे विरार डहाणू भागाचे नियंत्रण मुंबईतुन करावे तसेच वलसाड नियंत्रण कक्ष मुंबईत लवकरात लवकर आणावा अशी जोरदार मागणी खासदार महोदयांनी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या कडे केली.
याशिवाय पनवेल वसई दरम्यान चालणाऱ्या ४ फेऱ्या डहाणू रोड पर्यंत विस्तारित कराव्यात , पालघर व विरार हे स्थानके अद्यावत करावीत तसेच वाढती लोकसंख्या व नागरीकरण पाहता वसई नालासोपारा दरम्यान नवीन स्थानकाची गरज असल्याचे खासदार महोदयांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

वाढीव गावातील नागरिकांच्या सोयीसाठी MRVCC कडे रस्त्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

विरार, नालासोपारा, वसई स्थानकात गर्दी वाढत असून या स्थानकांवर अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच बोरिवली-अंधेरी स्थानकांच्या धर्तीवर या स्थानकांचा विकास करावा अशी मागणी करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील निरस्त केलेलं लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे तात्काळ पुर्ववत करण्यात यावे अशी मागणी खासदार गावित यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

वरील सर्व मुद्द्यांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत महाव्यवस्थापक श्री. मिश्र यांनी खासदार श्री. गावित यांना आश्वस्त केले. पालघर लोकसभा क्षेत्रातील अनेक रेल्वे समस्या लवकरच मार्गी लागतील असा आशावाद खासदार गावित यांनी व्यक्त केला.
यावेळी मुंबई रेल्वे प्रवाशी संघ उपाध्यक्ष श्री. नंदू पावगी, श्री. उप सेक्रेटरी श्री. आनंदपद्धनाभन, उपसेक्रेटरी तथा डीआरयुसीसी सदस्य श्री. हृदयनाथ म्हात्रे, डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचे श्री. हिमांशू वर्तक , प्रवाशी प्रतिनिधी श्री. संकेत ठाकूर, स्विय सहाय्यक प्रवीण घोगारी इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *