section and everything up until
* * @package Newsup */?> जव्हारला खासदार आपल्या दारी अभियानातुन समाजाला आश्वासनांची खैरात..जव्हार मध्ये, सत्ताधारी मंञ्यांचे दौरे वाढले. | Ntv News Marathi

जव्हारला खासदार आपल्या दारी अभियानातुन समाजाला आश्वासनांची खैरात
—-जव्हार मध्ये,सत्ताधारी मंञ्यांचे दौरे वाढले.

सेवाभावी संस्थाकडून मंञ्याच्या दौऱ्यांना पसंती,आदिवासी बांधवांना कुतूहल🤔
—– स्थानिक जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकींची चाहूल 😱

पालघर : जव्हार तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जव्हार नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली असताना आता सत्ताधारी मंञ्यांची पावले आपोआपच  जव्हार कडे वळू लागली आहेत.जव्हार तालुक्यातील सेवाभावी संस्था आदिवासी बांधवांच्या समस्यांचे भांडवल करुन आगाऊ निवडणुकींच्या तोंडावर राजकीय मंञ्यांचे दौरे घडवुन आणले जात आहेत.नोव्हेंबर महिन्यात मंञ्यांच्या दौऱ्यांचा सपाटाच लागला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जव्हारला येऊन लोकप्रतिनिधींचे कान टोचून गेले तर राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा त्यांचा शब्द खरा केला आहे. मी पुन्हा येईन,पुन्हा येईन हा शब्द त्यांनी खरा केला आहे.ते जव्हारला आले.आदिवासी बांधवांना पालघर जिल्ह्यात मेडिकल काँलेज उभारण्याचे स्वप्न दाखवून गेले.मंञ्यांचे दौरे फक्त निवडणुका जवळ आल्यावरच घडवून आणले जातात अन्यथा आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकीय नेत्यांना कधीच जाग येत नसल्याचे चित्र पालघर जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा तालुक्यात पाहावयास मिळते.एकदा निवडून आल्यावर पाच वर्ष मंञ्याची पाठ ग्रामीण भागाकडे फिरलेलीच असते.जेव्हा पुन्हा निवडणुका जवळ आल्या कि, आदिवासी बांधवांच्या समस्या त्यांना दिसु लागतात.अशाच काहीसा प्रकार पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावितांच्या बाबतीत खासदार आपल्या दारी अभियाना बाबत म्हणावे लागेल,खासदारांना मागील काळात आदिवासी बांधवांचे प्रश्न कसे दिसले नाहीत ? असा सवाल आदिवासी बांधवांना पडला आहे.
 खासदार आपल्या दारी हे अभियान गुरुवारी अजंता अँग्रो मल्टिस्टेट को.ऑफ.सो.लिमिटेड.यांच्या माध्यामातून,जव्हारच्या यशवंत देशमुख हॉल येथे नुकतेच पार पडले. ग्रामीण आदिवासी बांधव व अधिकारी वर्ग त्यांच्या उपस्थितीत प्रश्न,उपस्थित करुन समस्यांवर थेट संवाद साधला गेला.यावेळी खासदारांना विविध समस्यांची निवेदन हि देण्यात आली.यावर जनतेच्या समस्या जाणुन आश्वासन देत खासदारांनी समस्यांचे निवारण  केले.परंतु आश्वासने देऊन जनतेचे प्रश्न सुटतील का? हा कळीचा मुद्दा आहे.

मंञ्यांना आदिवासी भागाचा एकाएकी वाटतोय जिव्हाळा
जव्हार नगरपरिषदेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने तळागाळातील राजकीय नेते ही खडबडून जागी झाले आहेत.एरव्ही जनतेच्या नजरेतुन हरवलेले कार्यकर्ते हि कार्यक्रमांत जनमाणसांत दिसु लागले आहेत.भाजपाने जव्हार पंचायत समितीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.अशीच सत्ता जव्हार नगरपरिषदेवर मिळावी.यासाठी भाजपाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यासाठी कंबर कसली असुन आदिवासी बांधवांचे मन वळविण्यासाठी राजकीय मंञ्यांचे दौरे वाढवले आहेत.
शनिवारी जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधुन लोककला महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटन,कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जव्हारच्या जनतेला पर्यटन व रोजगार विकासाचे आश्वासन आदिवासी बांधवांना दिले.

राजकीय सत्ताधारी व विरोधकांत ताळमेळ नाही
आदिवासी समाजाच्या नावाखाली घेतलेल्या कार्यक्रमात सद्या ठराविकच एकाच पक्षाची मक्तेदारी पाहावयास मिळत आहे.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कार्यक्रमात भाऊगर्दी दिसते आहे.त्यामुळे व्यासपीठावर भाजपाच्या मंञ्याची बैठक दिसते.स्थानिक आमदार सुनिल भुसारा हि काही कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित राहत नसल्याने राजकीय पक्षातील नेत्यांचे आपसातील मतभेद समोर येत आहेत.जशा एका म्यानात कधीच दोन तलवारी बसत नाहीत तशाच काहीसा प्रकार सत्ताधारी पक्ष व विरोधक एका व्यासपिठावर बसलेले दिसत नाहीत.क्वचित काही विरोधक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमने-सामने असले तरी सत्ताधारी नेत्यांना ते चर्चेत चिमटे काढल्याशिवाय राहत नाहीत. जव्हार,मोखाडा तालुक्यातील राजकीय पक्षातील नेत्यांचे आपसातील मतभेद हे सुध्दा आदिवासी समाजाचा विकास खुंटण्याचे महत्त्वाचे कारण आहे.त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विचारांत ताळमेळ दिसत नाही.हि आदिवासी समाजाची मोठी खंत आहे.

  खासदारांकडून घरकुल,जव्हार पतंगशहा रुग्णालय,विनवळ आश्रम शाळेची पाहणी
खासदार राजेंद्र गावितांनी रायतळा येथील कातकरी वस्तीवर उभारण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी करत कातकरी समाजाच्या समस्या, त्यांच्या व्यथा, शासकिय योजना जाणुन घेतल्या तर जव्हारच्या पंतगशहा रुग्णालयात जाऊन तेथिल रिक्त पदे, डाँक्टर,नर्स,कर्मचारी यांच्या समस्या जाणुन घेतल्या.जव्हार रुग्णालयात स्ञीरोग तज्ञ हे पद रिक्त असल्याने ते भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खासदार गावितांनी विनवळ आश्रम शाळेला भेट देत तेथिल शिक्षण व्यवस्थेची पाहणी करत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोलर लाईटचे खासदारांकडून उदघाटन
जव्हार शहरातील नगरपरिषद हद्दीत वार्डात,रस्त्यालगत सोलर पथदिवे मागील तीनचार महिन्यां पुर्वीच बसविण्यात आलेले आहेत. परंतु ह्या योजनेचा उदघाटनाचा मुहूर्त खासदार गावितांच्या हस्ते केल्याचा दिखावा केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता चांगलीच रंगू लागली आहे.
सोलर दिवे बसवुन अनेक महिने उलटले असताना ह्या सोलर दिव्यांच्या काही भागातील लाखो रुपयांच्या बँटऱ्या चोरी झाल्याची तक्रार जव्हार नगरपरिषदेने जव्हार पोलिस स्टेशनमध्ये,दिल्याची माहिती खास जाणकारांकडुन मिळत आहे.
एवढे सर्व घडून गेले असताना ह्या सोलर दिव्यांचा उदघाटनाचा मुहूर्त एवढ्या उशिरा का? याचे सर्व सामान्यांना नवल वाटणे साहजिकच आहे.

खासदारांकडून मुस्लीम अल्पसंख्यांक समाजालाही आश्वासनांची लयलूट
  खासदार तुमच्या दारी ह्या  कार्यक्रमात जव्हारच्या यशवंत नगर मोर्चा येथील घाची हाँल मध्ये,गुरुवारी सायंकाळी खासदार गावितांनी अल्पसंख्याक मुस्लीम समाज बांधव,घाची जमात यांच्या समस्या जाणुन घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जव्हार  नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, मुस्लिम समाजातील माजी नगरसेवक रहीम लुलानिया, इम्रान मेमन ,फकृद्दिन मुल्ला, हबीब भाई शेख,माजी नगराध्यक्ष रियाज मनियार,नासिर मेमन वसीम तोहिद काझी, शोएब भाई लूलानिया,अकीब घाची व  इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.खासदार गावितांनी बोलताना अल्पसंख्याक समाजाला घाची हॉल येथे प्युअर ब्लॉक बसून दिले जातील,तसेच शिक्षणासाठी दहा काँम्पुटरची सुविधा करून देण्याचे आश्वासन दिले आहे.याशिवाय आठवड्या मध्ये,नगरपालिकेत मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान डेव्हलपमेंट साठी आलेले ४०लाख रुपये निधी सुद्धा टेंडर करून वर्ग करण्याचा आश्वासन अल्पसंख्याक समाजाला खासदारांनी दिले. तसेच रियाज मणियार यांनी चर्चे दरम्यान खासदारांना प्रश्न विचारला कि,अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी मिळणारा दहा लाख रुपयांचा निधी कोणत्या कारणामुळे आमच्या समाजाला देण्याचा बंद करण्यात आलेला आहे?  त्यावेळी खासदारांनी उत्तरदिले कि,आम्ही हा निधी सुद्धा परत मिळावा याची तरतूद लवकरात लवकर करू, तसेच जव्हार मधील आरोग्य सुविधा बघता खा.गावितांनी २०० बेडचा दवाखाना उभारण्याचे सुद्धा आश्वासन यावेळी मुस्लीम बांधवांना दिले. 
तसेच मोरांडा,पोशेरा या ठिकाणी कब्रस्तानच्या कामासाठी दहा दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
  आता खासदार आपल्या दारी ह्या कार्यक्रमात खासदार राजेंद्र गावितांनी जनतेला दिलेली हि भरभरून  आश्वासने किती दिवसात 

पूर्ण होतील? याकडे मुस्लीम अल्पसंख्याक समाजाचे लक्ष लागलेले आहे.

प्रतिनिधी
भरत गवारी (पालघर)
मो. 8408805860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *