आमदार सुनिल भुसारा व वसिम काझी यांचा सत्कार.
जव्हार तालुक्यातील डेंगाची मेट येथे कैवल्य चक्रवती श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनाच्या सोहळ्याचे औचित्य साधुन अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नुकताच ह.भ.प भक्तांकडून मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. हा सोहळा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर व श्री विठ्ठल रखुमाई मंदिर डेंगाची मेट येथे पार पडला. दि.२० नोव्हेंबर २०२२ ते दि.२२ नोव्हेंबर २०२२ अशा सलग तीन दिवस पारायण सोहळा भरविण्यात आला होता.
ह्या हरिनाम उत्सव सोहळ्यात पंचक्रोशीतील प्रसिध्द प्रवचनकार ,किर्तनकार यांची आध्यात्मिक,धार्मिक किर्तने ठेवली होती.ह्या धार्मिक ज्ञानाची भक्तांना पर्वणी ठरली तर तिसऱ्या दिवशी दिप पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.ह्या कार्यक्रमाला
विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भाऊ भुसारा तसेच,त्यांच्या सोबत वसिम तोहिद काझी हे आवर्जून उपस्थित होते. आमदारांच्या समवेत त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यांच्या हस्ते दिपपूजन झाले. वसिम काझी हे राष्ट्रीय पँथर्स आघाडी पालघर जिल्हा उपाध्यक्ष असुन त्यांचे ग्रामीण भागात सामजिक,धार्मिक,आरोग्य क्षेत्रातील उपक्रमात मोलाचे योगदान आहे.ग्रामीण भागातील धार्मिक कार्यक्रमांसाठी पुढाकार घेऊन ते सढळ हाताने देणग्या देतात.त्यांचे कार्य समाजासाठी अखंड प्रेरणादायी आहे.तसेच,आमदार भुसारांचे हि आदिवासी भागातील सामाजिक कार्यक्रमात भरीव योगदान आहे.
अशा ह्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दिपज्योती कार्यक्रम प्रसंगी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील चंद्रकांत भुसारा,वसिमभाई तोहिद काझी,डेंगाचीमेट गावचे सरपंच कमळाकर धुम,जि.प.सदस्य सुनिताताई धुम,उपसरपंच तुळशीराम बोरसे, युवा नेते अरमान मेमन,डेगांचीमेट ग्रामस्थ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, वारकरी संप्रदाय व पंचक्रोशीतील ह.भ.प भक्तजण आदी. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा अतिशय आनंदमय, भक्तीमय वातावरणात हा अदभुत सोहळा संपन्न झाला.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी,जव्हार(पालघर)
मोबा.नं*8408805860.