भाजपा कडून सभापतींची बिनविरोध निवड
—सभापती विजया लहारे तर उपसभापती पदी दिलीप पाडवी विराजमान.
भाजपाने शिवसेना युती धुडकावली
पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी मध्ये, सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुका झाल्या आहेत.जव्हार तालुक्यात ही ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या.त्यात ग्रामपंचायतींवर सरपंच व सदस्यांच्या नेमणुका झाल्या आहेत.
माञ जव्हार पंचायत समितीवरील सभापती व उपसभापती पदाच्या निवडी बाकी होत्या.त्यामुळे शिवसेना व भाजपा यांची पंचायत समितीच्या सभापतीसाठी युती होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम होता.माञ यावर आता पडदा पडला आहे. शुक्रवारी जव्हार पंचायत समितीत मिञ पक्ष भाजपाने शिवसेनेचा युतीचा प्रस्ताव फेटाळल्याने भाजपाला सभापती व उपसभापती निवडीचा मान मिळाला.यावेळी भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी सभापती पदी विजया लहारे(जंगलपाडा) व उपसभापती पदी दिलीप पाडवी (कोरतड)रा.पाडवी पाडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यामुळे जव्हार पंचायत समितीवर सभापती पदावर एक हाती सत्ता मिळाल्याने कमळ फुलले आहे. ह्या सभापती पदाच्या निवडी प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते हरिचंद्र भोये,माजी.जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई थेतले,भाजपा प्रसिद्धी प्रमुख महेश भोये आदी.पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
जव्हार पंचायत समिती मध्ये, सभापती उपसभापती निवडणुकीत भाजपाने मित्र पक्ष शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची खंत शिवसेनेच्या काही नेत्यांनी व्यक्त केली.युती धर्म न पाळल्याने सेनेच्या ठाकरे गटात नाराजी पसरली आहे तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये,जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"अडीच वर्षापूर्वी सभापती निवडणूकीवेळी भाजपाचे तीन सदस्य वेगवेगळया गटात सभापती पदासाठी पळाले होते. मात्र सेनेच्या तीन सदस्यांनी युती धर्म पाळून भाजपाला सभापती व सेनेला उपसभापती असे पद ठरलं होत मात्र यावेळी भाजपाने युती धर्म न पाळता पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख श्रावण खरपडे व माजी उपसभापती चंद्रकांत रंधा यांनी केला आहे."
— चंद्रकांत रंधा,माजी उपसभापती(शिवसेना), पंचायत समिती जव्हार.
"भाजपाचे दोन्ही सभापती बिनविरोध जव्हार पंचायत समितीवर विराजमान झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत जल्लोष पसरला आहे".
—सुरेश कोरडा,माजी सभापती(भाजपा),जव्हार पंचायत समिती.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर),
मोबा.नं*8408805860.