हप्तेखोरीने पोलिस प्रशासन बदनाम
जव्हार शहरात गेल्या काही महिन्यांपासुन शहरातील अवैध धंद्याना ऊत आला आहे. दारु,मटका,जुगार,गांजा,चरस ,अंमली पदार्थ यासारखे बेकायदेशीर अवैध धंदे सद्या जोमात सुरु आहेत.त्यामुळे समाजात व्यसनाधिनता वाढली आहे.आजची तरुण पिढी गांजा,चरस,दारुच्या आहारी जाऊन दिवसेंदिवस उध्वस्त होत आहे.माञ पोलिस प्रशासन अवैध धंद्याना रोखण्यात अपयशी ठरत आहे,त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.जव्हार शहरात पोलिसांचा अवैध धंद्यांवाल्यांना धाक राहिला नसल्याने पोलिसांना हप्ते देऊन हे धंदे सर्रास सुरु आहेत.ह्या पोलिस आधिकाऱ्यांच्या हप्तेखोरी मुळेच जनतेचा पोलिस प्रशासनावरील विश्वास उडाला असुन समाजाच्या नजरेत पोलिस प्रशासन बदनाम होत आहे.
जव्हार पोलिस स्टेशनला नुकतीच महिनाभरापूर्वी पोलिस निरीक्षक पदी सुधीर संखे यांची नियुक्ती झाली, माञ यांच्या मार्फत अवैध धंद्यांवर अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने ते हि बेकायदेशीर धंदे रोखण्यास अपयशी ठरले आहेत. शहरातील अवैध धंदेवाल्यांवर हप्ते लादून खुलेआम अवैध धंदे सुरु आहेत. मटका,जुगारवाल्यांकडून प्रत्येकी महिन्याला ७५ हजार, भंगारवाल्यांना प्रत्येकी ३० हजार, बेकायदेशीर जीप वाहतुकदाराकडून महिन्याला ७००रुपये हप्ता पोलिस प्रशासनाने ठरविल्याचे खास सुञांकडून माहिती मिळत आहे. जव्हार शहरात मटका जुगारीचे ३ आड्डे आहेत तर शहरात भंगार व्यवसाय करणारे ४ व्यापारी आहेत.गुटख्याचे व्यापार करणारे जव्हार शहरात २ मोठे व्यापारी आहेत. अशा अवैध धंद्यावाल्यांकडून मिळणारे हप्ते अधिकाऱ्यांना त्यांच्या पगारा पेक्षा जास्त गोड वाटतात.या कारणामुळेच पोलिस प्रशासन बदनाम झाले आहे. किराणा दुकान व अन्य खाद्य वस्तू विक्रेता यांच्या कडून हप्ते खाऊन आपला पोट भरत आहेत .
म्हणूनच आज पर्यंत जव्हार मध्ये, कोणत्याही प्रकारची काळ्या गुळाच्या विक्रेत्या वरती कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. तसेच अन्न व उत्पादन शुल्क विभागाची काळ्या गुळावर बंदी असतानाही दुकानांत काळा गुळ गुरांचे खाद्य सांगून गावठी दारू बनवण्यासाठी वापरला जातो.त्यामुळे आदिवासी बांधव आजही दारुच्या आहारी जात आहेत. ग्रामीण खेडे गावात काळ्या गूळाची विक्री केली जाते.रोजगाराचे साधन नसल्याने काही झोपड पट्टीत हातभट्टीची दारु बनवली जाते.इतर दारु पेक्षा दर कमी असल्याने ग्रामीण भागात हातभट्टीच्या दारुला अधिक पसंती आहे.ह्या दारुपायी आदिवासी बांधवांचे कित्येक संसार उध्वस्त झाले आहेत.तरी सुध्दा पोलिस प्रशासनाकडून याला लगाम घालता आलेला नाही.
जव्हार शहरात नुकताच काळ्या गुळाच्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यास जव्हार पोलिस अपयशी ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शनिवारी नौशाद ट्रेडर्स सलीम लुलानिया यांच्या किराणा दुकानात खाली करण्यासाठी आलेली काळ्या गुळाची गाडी क्रमांक- एम.एच.१२.डि.जी-४६११ हि जव्हार पोलिसां मार्फत पकडण्यात आली होती.हि गाडी पोलिस स्टेशन जवळील राममंदिर परिसरात आणुन उभी केली होती.परंतु काही
तासांमध्ये, व्यापाऱ्याने पोलिस प्रशासनाची संगनमत तोडपाणी करुन व्यापाऱ्यावर कोणतीच कारवाई गुन्हा न करता काळा गुळ भरलेली गाडी काही तासातच सोडून दिली आहे.त्यामुळे जव्हार शहरात पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये,चर्चेला उधाण आले आहे.
त्यामुळे नव्याने रुजु झालेल्या जव्हार पोलिस निरीक्षक सुधीर संखे यांच्या कडून अवैध धंद्यांना खतपाणी मिळत आहे. अशा शासकीय आधिकांऱ्याच्या हप्तेखोरी मुळेच जव्हार शहारात भ्रष्टाचार फोफावला असुन अवैध धंदे बोकाळले आहेत.शहरात जसजशा निवडणुका तोंडावर येत आहेत तसे अवैध धंदे व पार्ट्यांना पेव फुटत आहे.
ह्या भागातील विक्रमगड विधानसभेचे स्थानिक आमदार सुनिल भुसारा यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते.परंतु पोलिस प्रशासनाने त्याला हि केराची टोपली दाखविल्याचे पाहायला मिळत आहे.आता आमदार भुसारांकडून जव्हार पोलिस निरीक्षक सुधीर संखे याच्यावर काय कारवाई होणार? त्यांची पुन्हा कुठे उचलबांगडी होणार? याकडे जव्हारच्या जनतेचे पुन्हा लक्ष लागले आहे.
पशुधनाच्या नावाखाली काळ्या गुळाची आयात
उत्पादन शुल्क विभागाकडून काळ्या गुळाच्या विक्रीवर बंदी आहे.परंतु जव्हार,मोखाडा,विक्रमगड तालुक्यात पशुधन कमी असतानाही पशुखाद्याच्या नावाखाली सर्रास विक्री सुरु आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शेतकरी काळा गुळ मक्यापासुन गुरांना कडबा कुट्टी बनविण्यासाठी वापरतात.परंतु जव्हार मध्ये ,गुरांना असे खाद्य न बनविता काळ्या गुळाचा वापर केवळ हातभट्टीची दारु पाडण्यासाठी करण्यात येत आहे.
अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी तरुण पिढी
गोर गरीब मोल मजुरी करणारा तरुण वर्ग अंमली पदार्थ सेवनाला बळी पडत आहे.जव्हार शहरातील ओसाड पडिक इमारतीत गांजा बहादुरांचे अड्डे पाहावयास मिळत आहेत.नवीन कोर्ट,जुना राजवाडा,सनसेट पाँईट याठिकाणी गांजाडी अंमली पदार्थाचे सेवन करतात.दलालांमार्फत गांजाची लहान पुडी ५० रुपये ते मोठी पुडी ५०० रुपयाला विक्री होते. दरवेळी जागा बदलत असल्याने गांजा बहादुर पोलिसांच्या तावडीतुन निसटत आहेत.
अवैध धंदे रोखण्याच्या नावाने वाढीव हप्त्याची शक्कल
जव्हार पोलिस स्टेशनला आप्पासाहेब लेंगरेच्या बदली नंतर नुकतेच नवनिर्वाचित पोलिस निरिक्षक पदी सुधीर संखे यांनी पदभार स्विकारला आहे.एक कर्तव्य दक्ष,न्यायप्रिय पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख समाजात आहे.परंतु अवैध धंद्यावर निर्बंध घालण्यासाठी वाढीव हप्ते दिले तरच धंदे चालवा.अन्यथा चालवु नका.. ह्या नियमाने पोलिस प्रशासनाची प्रशंसा समाजातुन डावलली आहे.
परंतु काही जणांकडून याचे कौतुक ही समाजात केले जात आहे. पोलिस प्रशासन जर कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनले तर सामान्य जनतेने काय करायचं ? अशा सवाल सामान्य जनतेला पडल्याविना राहत नाही.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860.