कोब्रा कमांडो रामदास भोगाड्यांचे विशेष मार्गदर्शन.
जव्हार शहरात गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील युवकांसाठी पोलिस भरतीसाठी जिजाऊ कडून प्रशिक्षण दिले जात आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील युवक-युवतींना होत आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र अंतर्गत जव्हार शहरात मोर्चा येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. हे केंद्र अनिवासी असुन ग्रामीण भागातील युवकांसाठी खुले आहे.
जव्हारच्या जिजाऊ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात बुधवारी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी विशेष मार्गदर्शक म्हणून कोब्रा कंमाडो रामदास भोगाडे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.यावेळी ते सपत्नीक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना वह्या वाटण्यात आल्या. त्यांनी मुलांना त्यांच्या जीवनातील अनेक घटना सांगून पोलीस,आर्मी यामध्ये कसे भरती होता येईल. या बद्दल माहिती देऊन प्रशिक्षणार्थींचे मनोबल वाढवले. भोगाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांचा जीवन प्रवास, दैनंदिन जीवन, ट्रेनिंग ,भरती कशी करायची?,मैदानी खेळ, जनरल नाँलेज, नियमित व्यायाम व मनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मेहनत ,जिद्द ,चिकाटी च्या जोरावर आपण कुठलेही यश मिळवु शकतो. यासाठी त्याग पत्करुन वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे.नियमित व्यायाम केल्याने मन प्रसन्न व ताजेतवाने राहते.यासाठी पहाटे लवकर उठून दिनचर्या करणे महत्त्वाचे आहे.या मार्गदर्शनाने ५२ प्रशिक्षणार्थींना प्रेरणा मिळाली आहे.


या कार्यक्रम प्रसंगी जव्हार नगरपरिषद उपनगराध्यक्षा सौ.पद्माताई राजपूत, जिजाऊ तालुका अध्यक्ष मधुकर पवार, संजय रानडा जिजाऊ शाखा अध्यक्ष आपटाळे, विनोद कचवे, स्पोर्ट टिचर शंकर चौधरी व जिजाऊचे पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मो.8408805860.