जिजाऊ संघटनेत ८ ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर प्रवेश

पालघर : आज जिजाऊ पॅनेलच्या साधना शंकर जवळे यांची दाभाडी ग्रामपंचायती च्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.२०१८ मध्ये दाभाडी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे गणेश बाबन पिलेना यांची सरपंच पदी थेट निवड झाली होती.

मात्र २१ मार्च २०२२ रोजी त्यांचा अविश्वास ठराव मंजूर होऊन सरपंच पद रद्द झाले होते. याबाबत १२/५/२०२२ तहसीलदार डहाणू यांनी जिल्हाधिकारी पालघर यांनी या अविश्वास ठरावाची अंमलबजावणी करून निवडणूक घेऊन सरपंच पदाची फेर निवडणूक करणे बाबत पत्र दिले होते. या पत्रानुसार आज दिनांक ३१ मे २०२२ ग्रामपंचायत कार्यालय दाभाडी येथे रिक्त सरपंच पदाची निवडणूक झाली. यामधे जिजाऊ पॅनलच्या साधना शंकर जवळे ह्या बिनविरोध सरपंच झाल्या.निवडणूक निर्णय अधिकारी विनायक पाडवी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी एकूण ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांपैकी सरपंच साधना शंकर जवळे, सदस्य जयवंत राघ्या धोंदडे, विजय बाळ्या राथड, गणेश दामा पिलेना, वालकी धनजी हाडळ , सुनीता विलास पिलेना, आशा दीपक भोये, लखमी लक्ष्मण पिलेना यांनी जिजाऊ संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी जिजाऊ संघटनेचे जावेद खान, पंकज वसावे नगरसेवक नगरपंचायत तलासरी , संदीप चौधरी सायवन जिजाऊ गट प्रमुख, संदीप थोरात, अजय मेढा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *