section and everything up until
* * @package Newsup */?> जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक हीना शेख यांना रणरागिणी नॅशनल अवॉर्ड घोषित | Ntv News Marathi

धाराशिव जिल्ह्यामध्ये
जागतिक महिला दिनानिमित्त वेध फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने गेली सात वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. या अगोदर संस्थेने सुरत, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, पंढरपूर व सोलापूर येथे “रणरागिणी नॅशनल अवॉर्ड!” सोहळ्याचे यशस्वी आयोजन केलेले आहे. वेध फौंडेशनच्या अध्यक्षा स्वातीताई मोराळे यांनी ओबीसी फौंडेशन इंडियाच्या माध्यमातून देश पातळीवर अनेक राज्यात काम सुरु केले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक राजकीय, शैक्षणिक, गायन, नृत्य, स्वरक्षण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना शाल, श्रीफळ, फेटा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये फक्त ओबीसी महिलांचा नाही तर सर्व जाती धर्माच्या महिलांचा सन्मान केला जातो. त्यामुळे त्यांनी वेध फौंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून गोर गरीब, वंचित, ऊसतोड, मेंढपाळ आदिवासी लोकांना मदत करण्याचे काम स्वातीताई मोराळे व त्यांची टीम वेध फौंडेशनच्या माध्यमातून करत आहे. यावर्षी 36जिल्हा मधून 36महिलांची निवड करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हामधून पोलीस उपनिरीक्षक हीना शेख यांनी कोरोना काळात केलेले काम तसेच सध्या मुलींना स्वरक्षण संधर्भाने विविध कार्यक्रम घेऊन मुली मध्ये आत्मविश्वास वाढविणे तसेच भरोसा सेल मार्फतीने गरजू महिलांना मदत करणे 2022 मध्ये 511 महिलांच्या तक्रारी सोडवून उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांची उस्मानाबाद जिल्हा मधून निवड करण्यात आली आहे.वेध फौंडेशन पुणेच्या टीमने हीना शेख नाव पाठवले आणि राष्ट्रीय निवड समितीने त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्याचा निर्णय घेतला व त्यांना रणरागिणी नॅशनल अवॉर्ड घोषित केला.सदरील कार्यक्रम हा जाधवर एज्युकेशन सभागृह, नऱ्हे, सिंहगड रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. मा. आर. राजा (DCP, पुणे )मा. संतरणा पाटील (DCP पुणे ). मा. गणेश सोनुने (उपायुक्त, मनपा पुणे )मा. नरेंद्र दराडे (आमदार, विधान परिषद )यांच्या उपस्थितीमध्ये झाले आहे

प्रतिनिधी आयुब शेख धाराशिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *