
पालघर ( मोखाडा ) : ९९ टक्के आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.वर्षभर शेतीच्या शिवारात बळीराजा चा संवगडी म्हणून ऊण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता काम करणाऱ्या बैलांना औक्षण ( रुग्ण व्यक्त ) करणारा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर आल्याने बाजारपेठेतील दुकाने सज्ज झाली आहेत. वर्षे भर शेतकऱ्यांचा मित्र म्हणुन ऊण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सर्जाराजा काळ्याभोर आई च्या कुशीत पिकांच्या राबणीसाठी बळीराजा ची सोबत करत असतो अशा या सर्जा राजा च्या कष्टाचे आभार व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण हा तालुक्यातील ग्रामिण भागात मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.बैलपोळा सणाच्या पुर्वसंध्येला तालुक्याची बाजारपेठ सज्ज झाली असुन बाजारपेठेत रंगीबेरंगी तुरे, लहान मोठ्या माळा, हार तसेच विविध प्रकारच्या रंगांनी सजल्या असुन मागील वर्षीच्या तुलनेत वस्तुचे भाव मात्र पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत.चालु वर्षी पावसाच्या लहरी पणामुळे शेतकऱ्यांला अनेक संकटांचा सामना करावा लागला.त्यातच खते, बी बियाणे, मजुरांची मजुरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसली तर ऐनवेळी जनावरांना लम्पी त्वचा रोगाची लागण झाल्याने काही काळ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती परंतु पशुवैद्यकीय अधिकार्यांनी वेळीच उपाययोजना केल्या मुळे शेतकऱ्यांवर आलेले मोठे संकट टळले. एकंदरित वर्षभर बळीराजाला शेतीच्या शिवारात सोबत करणार्या बैलांचा बैलपोळा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसी येत असल्याने ग्रामीण भागातील जनता बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करतात..