धाराशिव : उमरगा तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहशालेय उपक्रमांतर्गत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वजीत खटके,शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी,नामदेव पाटील,सुजित बोकडे,अभिषेक माने यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
आईचं बोट सोडून शाळेतल्या बाईंचं बोट धरणारा इयत्ता पहिलीतला विद्यार्थी ते सातवीतला एक हुशार विद्यार्थी इथपर्यंत त्याचा सर्वांगीण विकास करून पुढील शिक्षणासाठी आणि आव्हानं पेलण्यासाठी सक्षम विद्यार्थी तयार करण्याचं कार्य प्रत्येक शिक्षक करत असतात.त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.असे मत याप्रसंगी लक्ष्मी वाघमारे यांनी व्यक्त केले.तसेच प्रवीण स्वामी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
अशोक बिराजदार यांच्यासह प्रसाद खटके,आदित्य खटके,लक्ष्मण वाघमोडे,अश्विनी खटके,सायली खटके,समृध्दी सूर्यवंशी या शिक्षक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना भावनावश झाल्याचे दिसून आले.
यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार उमाचंद्र सूर्यवंशी यांनी मानले.
सचिन बिद्री