महसूल क्षेत्रातील मानाचा पुरस्कार..!

धाराशिव : सन 2023 सालातील महसूल क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार,राज्यस्तरीय महसूल आयकॉन 2023 हा पुरस्कार तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना जाहीर करण्यात आला असून सर्व स्तरातून श्री तांदळे यांचे कौतुक होत आहे.अत्यंत शिस्तप्रिय, कार्यतत्पर,आपल्या सेवेत तर्बेज तथा हुशार असनारे तुळजापूर तहसीलदार पदावर कार्यरत असताना शेतकऱ्यांना न्याय देणारे व कोरोनाच्या संकटकाळात स्वतः प्रत्यक्ष ग्राउंडवर कार्य करून जनतेमध्ये जनजागृती घडवून योग्य त्या उपाययोजना आखणारे श्री तांदळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा मानाचा राज्यस्तरीय युगदर्शक महसूल आयकॉन हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. लवकरच संपन्न होणाऱ्या या भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्थे प्रदान करण्यात येणार असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या सोहळ्याचा लवकरच तारीख ठिकाण व वेळ जाहीर होईल असे युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे विश्वस्त प्रमुख श्री नितीन भोसले यांनी माहिती दिली.

अयुब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *