नाशिक : वणी – नाशिक रस्त्यावर वलखेड फाट्या नजिक आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास अल्टो कारला भरधाव पिकअपने धडक दिल्याने वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक रामदास माधव शिंदे, वय ५८ हे जागीच ठार झाले आहे.

उद्या ता. २५ रोजी वणी महाविद्यालयात प्रा. रामदास शिंदे यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न होणार होता. त्यासाठी गेले चार पाच दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सेवापूर्ती कार्यक्रमाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण मोबाईलद्वारे, व्हॉटसद्वारे निमंत्रण पत्रिका पाठवून कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहाणार होते. त्यादृष्टीने महाविद्यालयाने जय्यत तयारी केली होती. आज, ता. २४ रोजी सकाळी नेहमी प्रमाणे ते नाशिक येथून वणी येथे महाविद्यालयात आपली अल्टो कारने येत असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान दिंडोरी येथी ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून त्यांच्यावर रौळस पिंप्री, ता. निफाड येथे त्यांच्या मुळगावी आज, ता. २४ दुपारी दीड वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. शिंदे हे वणी महाविद्यालयात उच्च माध्यमिक व्यवसाय (H.S.V.C.) अभ्यासक्रम सुरु झाल्यापासून गेले तीस वर्षांपासून कार्यरत होते. वणी येथे गेल्या २५ वर्षांपासून ते वास्तव्यास होते. पाच वर्षांपासून मुलांच्या शिक्षणासाठी ते नाशिक येथे राहात होते. त्यांच्या अपघाती निधनाने वणी पंचक्रोषीत हळहळ व्यक्त होत आहे.

दिगंबर पाटोळे वणी नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *