सप्तरंग मंगलकार्यालय लोहारा येथे “शासन आपल्या दारी, हा जनतेसाठीचा उपक्रम सेना-भाजप सरकारने शुभारंभ करून राबवला. जनतेचे शासकीय कामासाठीचे कार्यालयीन हेलपाटे होऊ नयेत यासाठी हा मोठा उपक्रम शासनाने जनतेसाठी थेट राबवला ही मोठी पर्वणी आहे .
आ.ज्ञानराजजी चौगुले साहेब , सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी आणि लाभ घेणा-या सामान्य आशा ठेवून असलेल्या जनतेची उपस्थिती किती समाधानी होती त्यांच्या जलद होणा-या कचेरी कामामुळे.
शासन आपल्या दारी या उपक्रमात एकही नागरिक वंचित राहु नये याची काळजी घेण्याची सुचनावजा विनंती चौगुले साहेबांनी यावेळी केली …
विकासाचा वेगळा हटके पॅटर्न राबवणारे आमदार चौगुले साहेब यांनी उमरगा -लोहारा तालुक्याचा अगदी मुळापासून कायापालट केलेला आहे.
न थांबता अखंड योजना पारड्यात पाडून विकासाचा पाया घट्ट करणा-या आमच्या या विकासरत्न आमदाराला मानाचा मुजरा …
शब्दप्रभू माजी खासदार रविंद्रजी गायकवाड साहेबांसारखे समाजकारणी गुरू आणि युवा नेतृत्व किरणजी गायकवाड यांच्या साथीने विकासाची घौडदौड कायम राखताना कधीही थकलो आता पुरे हा निगेटिव्ह विचार साहेबांना कधी पडलेला नाही .
खंद्दे तालुक्यातील समर्थक सोबत घेवून तालुक्याला घर मानणारा हा कुटुंब प्रमुख अविरत घरासाठी झटतो आहे …
बांधाबांधावर जावून शेतक-यांच्या शेतात शिरलेला ओला दुष्काळ पाहून तो पोटतिडकीने अधिवेशनात मांडून अनुदान खेचून आणणारा हा सालगडी सर्व शेतक-यांच्या सामुहिक सालगडी आहे …
कोरोना काळात ग्राऊंडवर फिरणारा कोरोना योध्दा कोरोना होऊन सुध्दा कधी डगमगला नाही .
आरोग्य विभागाच्या रुग्ण खोल्या जातीने फिरून देखरेख सांभाळणारा आमदार डॉक्टर झाला ..
या काळात त्यांचे गुरू शब्द प्रभू रवि सर आणि युवा नेते किरणजी गायकवाड यांनी कोरोना योध्दा टीम तयार करून ग्राऊंड लेवलवर फिरून कोरोना पिडितांचे पालकत्व स्विकारले.
उस्मानाबादच्या दिव्यांग भावा-बहिणीला कोरोनाकाळात अगदी स्वतः जावून आर्थिक मदत देणारे हे आमचे विकासरत्न आमदार मदतनीस सुध्दा झाले …
अंगणवाडी सेविका , आरोग्य सेविका , आशा कार्यकर्ते या सर्वच महिला सक्षम व्हाव्यात यासाठी पोटतिडकीने यांचे मानधन वाढवण्यासाठी आर्जव करणारा हा आमदार त्या असंख्य महिलांचा बंधू झाला .
स्वातंत्र्य सैनिकाचे मानधन दुप्पट करण्यासाठी मागणी करून ती मान्य करून घेवून एक सन्मानाचे जीवन देणारा राजामाणूस हा व्यक्ती झाला .
उमरगा तालुक्यातील व्हंताळ व इतर अनेक ग्रामपंचायत भागात स्मशानभूमी नव्हती तेव्हा अंत्यविधी करताना पावसाळ्यात व्यत्यय यायचा . याची दखल घेवून व्हंताळ गावासह इतर स्मशानभूमी नसलेल्या गावांना ती विकास निधीतून मंजूर करून त्याचे बांधकाम पुर्णत्वास नेणारा हा अभियंता आमदार .
कर्नाटक सिमेवरील महामार्ग रखडलेला असताना गडकरी साहेबांशी पत्रव्यवहार करून तो पुर्णत्वास नेणारा हा रस्ता किमयागार .
शेतरस्ते , गावातील अंतर्गत रस्ते , वस्ती योजनेतून वस्तीचे रस्ते व विकास या सर्वच बारिकसारिक योजनेच्या माध्यमातून जलदपणे निधी खेचून आणून बरेच रस्ते पुर्ण आणि काही मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत .
प्राथमिक शाळेसाठी पुरेशी शिक्षक भरती ,क्रिडासाहित्य , क्रिडांगण यासाठी विनंती करून बराच निधी खेचून आणून बरेच शाळा संगणकीय करण्याचा मोठा विचार करणारा शिक्षणतज्ञ हा आमदार झाला …
उमरगा पोलीसांसाठी रहाण्यासाठी सध्याची वसाहत जुनी आहे तसेच पोलीस बळ कमी आहे . यासाठी अधिवेशनात पोलिसांना पक्का निवारा आणि नवीन पोलीस स्टेशनांची मागणी करणारे हे आमदार साहेब खाकी वर्दीची जाण ठेवून आहेत …
जुनी पेन्शन योजना चालू करण्यास शासन तयार नसताना अधिवेशनात शिक्षक लोकांची बाजू मांडणारे तठस्थ समाजकारणी म्हणजे आमचे चौगुले साहेब …
अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देवून शिक्षणाची दारं आणि अंतर खेड्यातील मुलांसाठी कमी करण्यासाठी पाठपुरावा करणारे आमदार साहेब शिक्षणाच्या बाबतीत काटेकोर आहेत …
काही महाविद्यालयांना अनुदान मंजूर झालेले आहे आणि काही विचाराधीन आहेत ….
गोरगरिबांच्या लग्न समारंभाला उपस्थिती लावून आशीर्वाद देणारा आणि आशीर्वाद घेणारा हा साधा माणूस आमच्या तालुक्याचा आमदार आहे याचा अभिमान वाटतो …
या लेखातून जनतेला आवाहन आहे की , साहेबांकडे कुठलेही प्रश्न घेवून आणि अडचणी घेवून जा त्या नक्कीच सोडवल्या जातील असे तालुक्यातील एकही गाव नाही जिथे साहेबांनी विकास योजना आणि निधी दिलेला नाही ते गाव शोधावे लागेल .
त्यासाठीच तर साहेबांनी स्वतःला लक्ष्मीपाटी सभामंडप उदघाटन वेळीच्या भाषणात सालगडी असे संबोधले आहे …
तो सालगडी तुम्हाला कधी निराश करणार नाही . साहेबांचे बळ वाढवा , विश्वास दाखवा आणि पाठीशी भक्कम उभे रहा …
यापेक्षा मोठा विकासाचा कायापालट तुम्हाला दिसेल ….

धन्यवाद
परमेश्वर साळुंके ,संदिपान बनकर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ वर्ग धानुरी
ता.लोहारा .जि. उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *