अन्यथा कठोर कारवाई करण्यात -सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांचा इशारा
जालना : जिल्ह्यातील *टेंभुर्णीत वेळोवेळी निर्माण होत असलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी टेंभूर्णी पोलीस स्टेशन चे एपिआय रविंद्र ठाकरे यांनी शांतता समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील समाजबांधवांनी निर्णय घेतला की टेंभूर्णी गावाला सर्वधर्मीय बंधुभावाचा इतिहास आहे. आणि आम्ही सर्वजण गावचा हा एकोपा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू. जर कुठल्याही समाजातील मुठभर तरुणांनी गावातील शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर पोलीसांनी त्यांच्या वर कठोर कार्यवाही करावी. अशावेळी आरोपींच्या मदतीसाठी गावातील कोणतेही समाजबांधव धावुन येणार नाही. यासोबतच असेही ठरले ही सर्वप्रथम सर्वजण आपापल्या जाती धर्मातील तरुणांचे समुपदेशन करतील. इतक्यावरही ऐकले नाही तर पोलीसांनी कठोरात कठोर कार्यवाही करावी. याची सर्वस्व जवाबदारी संबंधित तरुणांवर राहील. सामाजिक तेढ निर्माण करणारे फक्त मुठभर असतात मात्र त्याचे परिणाम पिढ्यानपिढ्यांना भोगावे लागतात. यासाठी तरुणांनो, आपल्या करिअरकडे लक्ष द्या. तुमच्या कुटुंबाला तुमची खुप गरज आहे. आपलं गावं आपलं कुटुंब आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने नांदा.असे आवाहन करण्यात आले.याबैठकीस गावातील सर्व जातीय धर्माचे नागरिकांनी बैठकीला उपस्थिती लावली होती….