आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावरून काम करणार्या होतकरू कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचे ठरल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जून खरगे साहेब यांचे मान्यतेने, ओ.बी.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजयसिंहजी यादव यांचे आदेशाने आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने काँग्रेसच्या ओ.बी.सी.विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.भानुदासजी माळी साहेब यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि नाभिक समाजाचे नेते तसेच श्री.संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव चव्हाण यांची कराड येथील कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस च्या ओ .बी.सी.विभागाचे अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.सदर प्रसंगी नियुक्ती पत्र प्रदान करताना मा.माळी साहेब,ओबीसी विभागाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव गावडे,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री.अशोकराव जाधव,सोबत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हनीफ खलिपे,सेवादल विभागाचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार,जिल्हा काँग्रेस सेक्रेटरी श्री.राजेंद्र भुरण, ओ.बी.सी.विभागाचे जिल्हा सेक्रेटरी संदिप बांद्रे , ओ.बी.सी.चे चिपळूण तालुका अध्यक्ष केशव लांबे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत किल्लेदार,श्री.राज कुमार लांबे,सातारा जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष संजय तडके,संपत पवार,रमेश नांगरे इत्यादी*

प्रतिनिधी.
मुनीर शेख.
चिपळूण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *