घनसावंगी प्रतिनिधी राजेश वाघमारे
जालना : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांची पडझड,फळपिकांबरोबरच विहिरी, रस्ते,पुल, शाळाखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची अधिकाधिक भरपाई मिळावी यासाठी प्रत्येक विभागाने नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात माहे जुलै महिन्यात 2 हजार 900 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले असुन नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करुन निधीची मागणी करण्यात आली आहे तसचे ऑगस्ट महिन्यामध्ये 1 लक्ष 25 हजार 686.40 हेक्टर, माहे सप्टेंबरमध्ये 80 हजार 286.23 हेक्टर असे एकुण 2 लक्ष 8 हजार 873.08 क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अतिवृष्टीमुळे 662 गावे तर 1 लक्ष 97 हजार 499 शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन 4 व्यक्ती मयत, एक व्यक्ती जखमी, लहान व मोठे अशा एकुण 255 जनावरे, 820 कोंबड्यांची हानी, 217 कच्च्या घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी सर्वश्री संदीपान सानप, भाऊसाहेब जाधव, स्वप्नील कापडनीस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी.एस. रणदिवे, कार्यकारी अभियंता श्री डाकोरे, तहसिलदार प्रशांत पडघन आदींची उपस्थिती होती.