जिल्हा प्रतिनिधी
( आयुब शेख )
अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी ८ डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी
पदभार स्वीकारल्यापासून नळदुर्ग शहर व परिसरातील गावगुंडांना खाकीची धाक दाखवून सळो की पळो करून सोडले होते त्यामुळे नळदुर्ग परिसरात गुन्हेगारी वृत्ती चे लोक पूर्णपणे नाहीसे झाले आहेत.
तसेच सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे
रसायन मिश्रित हातभट्टी दारूच्या अनेक भट्ट्या उध्वस्त केले. कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावरून
अवैधरीत्या होणाऱ्या गुटखा वाहतुकीला आळा घालण्यासाठी सापळा रचून लाखो रुपयांचा गुटखा माफियांच्या विरोधात कारवाई केली तसेच अनेक
प्रलंबित गुन्हे निकाली काढल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची कामगिरी कौतुक करत समाधान व्यक्त केले.
नळदुर्ग पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश अप्पर पोलीस अधीक्षक गोैहर हसन. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी . पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख.
व इतर अधिकारी उपस्थित होते.