(सचिन बिद्री:धाराशिव)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती सहजगत्या मिळते. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आवश्यक असणाऱ्या व्यावहारिक आणि व्यावसायिक कौशल्याची गरज आहे म्हणून प्राध्यापकांनी आपल्यामध्ये बदल करून अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम तयार करावे. तरच ग्रामीण विद्यार्थ्यांची क्षमता विकसित होईल असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.


धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारत शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांचा सत्कार आणि सेवा गौरव सोहळा संपन्न झाला.यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल(भैय्या)मोरे,सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे आणि संचालकांच्या हस्ते कुलगुरू डॉ. येवले सरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी आपल्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यापुढे शैक्षणिक संस्थांना केवळ समस्या सांगून चालणार नाही. तर समस्यांवर स्वतःच उत्तरे देखील शोधावी लागतील. आणि आपल्या भागातील समाजाच्या गरजेनुसार नवे अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, त्यासाठी विद्यार्थी केंद्रीभूत माणूनच आपल्या कार्यकाळात शैक्षणिक आणि संशोधनाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.


याप्रसंगी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी भारत शिक्षण संस्थेने स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून बदलत्या काळात आणखी सुविधा उपलब्ध करून देताना विद्यापीठाने सहकार्य करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव डॉ भगवान साखळे हे उपस्थित होते. त्यांनी कुलगुरू डॉ . प्रमोद येवले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी आणि प्रशासन चालवण्याचे त्यांचे कौशल्य याविषयी माहिती देताना दीक्षाभूमी ते शिक्षाभूमी या साडेचार वर्षाच्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीतील केलेले प्रशासकीय, शैक्षणिक आणि संशोधन कार्याची माहिती दिली आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
याप्रसंगी व्यासपीठावर भारत शिक्षण संस्थेचे संचालक भानुदासराव माने, अशोकराव पाटील, दिगंबरराव बिराजदार, प्राचार्य डॉ एच एन रेडे, प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ .पद्माकर पिटले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी.एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सन्मान पत्राचे वाचन उपप्राचार्य डॉ .संजय अस्वले यांनी केले तर डॉ. विनोद देवरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *