वाळूज/ छत्रपती संभाजीनगर.
तीसगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत नवीन उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे.
उपसरपंच नागेश कुठारे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ३० ऑक्टोबरला आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. ग्रामपंचायतीच्या सभेत नागेश कुठारे यांचा राजीनामा मंजूर झाल्याने या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तीसगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत निवडणूक घेऊन उपसंपचाची निवड करण्यात आली. प्रविण हांडे यांना 10 तर नितीन जाधव यांना 7 मते पडुन प्रविण हांडे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळूज छत्रपती संभाजीनगर.