चामोर्शी तालुक्यातील आष्टी पेपर मिल कॉलनी मध्ये दिनांक 13.9.2021रविवार रोजी सायंकाळी सात वाजताचे दरम्यान चपराळा अभयारण्यतील बिबट्याने मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केले जखमी मुलाचे नाव अंश मनोज मोरे वय 8 हे गणेश आरती करिता असताना अचानक बिबट्याने मुलावर हल्ला केला तेव्हा सिक्युरिटी गार्डने काटिने मारून बिबट्या ला हाकलुन लावला असून यात मुलाला हाताला गम्भीर दुखापत झाली असून मुलाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
आष्टी परीसरात गेल्या वर्षी पासून बिबट्याची दहशत आहे या चपराळा अभयारण्याला लागून असलेल्या गावात वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसून मानवी हल्ले केले करीत आहेत चपराळा वन्यजीव अभयारण्य आष्टी परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहेत करीता चपराळा वन्य जीव विभागाने मानवी वस्तीत हल्ले करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे असे पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली
Skip to content