बुलडाणा : मलकापूर येथे एकाने घरात गळफास तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याने मलकापूर शहर हादरले . किशोर वसंता वानखेडे वय २ ९ , रा . मंगलगेट , मलकापूर व रोशन मुरलीधर टावरी वय ३८ , रा . वृंदावननगर , मलकापूर अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत .

किशोरने दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीने गळफास लावून घेतला तर रोशनने वृंदावननगरच्या मागे असलेल्या शेतातील आंब्याला झाडाखाली विष घेतले . दोन्ही घटनांप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे . तपास शहर पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . अजूनही दोघांचे मृत्यूचे कारण स्पष्ट असले तरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे…