बुलढाणा : शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते मदनभाऊ लखानी यांचे २ सप्टेंबर रोजी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशी की , मदनभाऊ लखानी वय ७१ हे अकोला येथे गेले होते . अकोला येथून मलकापूर येथे रेल्वेने येत असतांना ते हावडा मेल एवजी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले होते . सदर गाडी मलकापूर स्थानकावर थांबत नसल्याने गाडीचा वेग कमी झाला असता त्यांनी चालू गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी अपघात होवून त्यांचे दोन्ही पाय कटल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला . याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.त्यांचे पश्चात पत्नी , २ मुले , १ मुलगी असा आप्त परिवार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *