बुलढाणा : मलकापूर रेल्वे स्टेशन स्थित भारतरत्न सौंदर्यीकरनाआची चौकशी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे .

याबाबत भाजप दलीत आघाडीचे शहराध्यक्ष कुणाल सावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की , न.प . रेल्वे स्टेशन स्थित भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरना सह परीसरात ३०० लिटर आर.ओ. प्लॉट , पुतळयाच्या आजूबाजूला संविधान लिहून त्याचा स्तंभ निर्माण करण्यासाठी नगरपरीषद ठरावानुसार १३.०८.२०१८ रोजी मंजुरात देवून कामाबाबतची निवीदा प्रसिद्ध करून कामाचा ठेका दिला होता .

बुलढाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण कामातील अनियमिततेच्या चौकशिची मागणी

सदर काम पूर्ण झाले असून त्याचे देयक सुध्दा ठेकेदाराला देण्यात आलेले आहे . ठेकेदाराने न.प.च्या संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमताने आर . ओ . प्लॅट कारंजे व वरील स्तंभ निर्माण केलेला नसुन आपले देयक उचलले असल्याचे दृष्टिक्षेपात येत असल्याने सौंदर्य करणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे चित्र समोर येत आहे प्रकरणाची योग्य ती चौकशी करून ठेकेदारासह न.प. चे संबंधित अधिकारी व दोषी पदाधिकारी यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करावी अशी विनंती त्यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *