मलकापूरः येथे नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी सोमवारी पदभार घेतला आहे.डि वाय एस पी दिलदार तडवी सेवानिवृत्त झाल्यावर मलकापूर येथील पद रिक्त होते.त्या जागी आय पी एस अधिकारी अभिनव त्यागी आज रुजू झाले आहेत.ते सन २०१ ९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.आग्रा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून यापूर्वी नेवासा अहमदनगर येथे कार्यरत होते.गेल्याच आठवडयात बदल्यांची प्रक्रिया पार पडली होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *