चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील बिजनबाई हरीदास पोटे हिला आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता रक्त कमी असल्याने रक्ताची आवश्यकता आहे व गडचिरोली येथे न्यावे लागते असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले असता सदर रूग्णाचा मूलगा अक्षय हरीदास पोटे यांनी जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार व सामाजिक कार्यकर्ता श्री संजय भाऊ पंदिलवार यांना माझ्या आईला रक्ताची आवश्यकता असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात येथे भरती असल्याची माहिती दिली जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार व सामाजिक कार्यकर्ता श्री संजय भाऊ पंदिलवार यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता ताबडतोब जीजाबाईला रक्ताची सोय करून दिली व गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात रक्त मिळणारा कार्ड उपलब्ध करून दिले जिल्हा परिषद सदस्यांनी रक्त मिळणारा कार्ड उपलब्ध करून दिल्याने जिजाबाईच्या मूलाने जिल्हा परिषद सदस्याचे आभार मानले
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *