Month: September 2026

धर्मवीर गडासाठी ५ कोटी मंजूर; स्मारकाचा मार्ग मोकळा!

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तसेच गडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि…

फलटण रुग्णालयात पुन्हा डॉक्टरचा मृत्यू; व्यवस्थेवर प्रश्न!

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वारंवार तक्रारी…

भुईकोट किल्ल्याचा कायापालट होणार; विकासाचा मार्ग मोकळा!

अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला असून, यामुळे संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित…

युवकांचे टाकीवर आंदोलन!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवघा येथे दोन युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची…

लेकींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई; मॅरेथॉन जिंकली!

ना महागडे स्पोर्ट्स शूज, ना ट्रॅकसूट, ना प्रशिक्षकाचे मार्गदर्शन… मात्र हातात रोजच्या कष्टाची ताकद आणि मनात दोन लेकींच्या उज्ज्वल भविष्याची जिद्द घेऊन ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी साडी नेसून अनवाणी…

दहिगावच्या बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह !

यावल तालुक्यातील दहिगाव येथील बेपत्ता तरुण नरेंद्र उर्फ न्यायबु यादव पाटील याचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ३० ऑगस्ट रोजी घरातून कोणाला न सांगता निघून गेल्यानंतर…

गोंदियात पावसाचा कहर; आजारांचा धोका वाढला!

गोंदिया जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू असून, जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. उलटी, हगवण आणि टायफॉईडसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पावसामुळे…