शाळा वेळात मुख्य चौकात पोलीस तैनात करुन वाहन नियम मोडणारास दिला कायद्याचा दणका
फुलचंद भगत
वाशीम:-मंगरुळपीर येथे मुख्य चौकात व ठिकठिकाणी शाळा भरायच्या आणी सुटायच्या वेळात दि.२५ जुलै रोजी पोलीस तैनात करुन सैराट बाईकस्वार आणी अल्पवयीन शाळकरी वाहनचालकांना पोलिसांनी कायद्याचा दणका दिला.वाहतुकीचे नियम मोडणार्या अल्पवयीन वाहनचालकांवर ट्राफिक विभागाने कारवाई केली.मुलांना नियम न तोडण्याविषयी समज देवुन समजावुन सांगीतले तसेच त्यांच्या पालकांना बोलवुन कायदेशीर कारवाईची प्रक्रीयाही करण्यात आली.
अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी व अन्य अल्पवयीन मुलांच्या हातात स्कूटर, मोटार सायकल,पल्सर ही वाहने दिसून येत असून सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांचा सुळसुळाट हा रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन चालकासाठी धोकादायक व अपघाताला निमंत्रण ठरत आहे.विनापरवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वाहनधारक व पादचाऱ्यांचे देखील जीव धोक्यात येऊ शकतात. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद असली तरी कारवाईची कठोरतेने अंमलबजावणी होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत असून सुसाट धावणारी ही वाहने मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. दुचाकी वाहनावर किती प्रवासी बसावेत याचे भान देखील हे अल्पवयीन विनापरवाना वाहनधारक ठेवत नसल्याचे दृष्टीस पडत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मोटार वाहन कायदा व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलीस यंत्रणेने सुरू करण्याची गरज आहे.मंगरुळपीर पोलिसांनी दि.२५ जुलै रोजी अशा सैराट बाईकस्वार व अल्पवयीन शाळकरी वाहन चालकांवर कारवायाचे सञ राबवले.
कायद्याची जनजागृती आणी जबाबदारीची जाणीव गरजेची
अल्पवयीनाने वाहन चालवणे अशा गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत शिक्षा व २५ हजार रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. शालेय जीवनावर शालेय जीवनातच मुलांना वाहतुकीचे नियम शिकविले जातात मग शाळकरी मुलांना शाळेत, महाविद्यालयात वाहन न आणण्याची जबाबदारी जेवढी पालकांची आहे तेवढीच शाळा व्यवस्थापनाची ही आहे जो विद्यार्थी शाळेत वाहन आणत असेल त्यास वेळीच आळा घालण्याचे कर्तव्य शाळा व्यवस्थापन समितीचे असल्याने या समितीने संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना शाळेत सदर वाहन आणण्यास प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.पोलिस विभागाकडुन व आरटिओ विभागाकडुन वाहन कायद्याविषयी जनजागृती केल्यास अशा नियम मोडणारावर आळा घालता येवु शकतो.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206