section and everything up until
* * @package Newsup */?> मंगरूळपीर तालुक्यातील 'त्या'घरकुल प्रकरणाविषयी कारवाई अजुनही गुलदस्त्यातच | Ntv News Marathi

घरकुल न बांधताही शासनाचा निधी हडप करणारांवर कारवाई कधी?

शासनाच्या निधीला चुना लावणार्‍यावर कारवाई होणार की ‘घेवुन देवुन सेटलमेंट’ करणार?

ग्रा.पं.मार्फत घरकुल घरकुलाचे बांधकाम पुर्ण न करणार्‍या लाभार्थ्यांना नोटीसही हवेतच विरल्या?

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे काहींनी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल न बांधताही जुनेच घर दाखवुन शासनाचा निधी हडपल्याची लेखी तक्रार माजी ग्रा.पं.सदस्य अतुल उमाळे यांनी प्रशासनाकडे करुनही याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसुन दोषींना पाठीशी तर घातल्या जात नाही ना असा प्रश्न ऊपस्थीत होत असुन कर्तव्यदक्ष मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देवू स्वतः घरकुल प्रश्नाची ‘स्पाॅट पाहणी’ करावी अशी मागणी आता होत आहे.
वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२३ ते २०२४ या कालावधीत निवासी प्रयोजनासाठी घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात येऊन पहिला हप्ता तर काहींना दुसराही हप्ता वितरित करण्यात आला.शंभर दिवसात बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असतांनाही घरकुलांचे बांधकाम सुरूच झालेले नसल्याचे समोर आले तर काहींनी अर्धेच बांधकाम करुन काम थंडबस्त्यात ठेवलेले दिसते.काही ग्रा.पं.कडुन सात दिवसात घरकुलाचे काम पुर्ण करण्याच्या नोटीसही देण्यात आल्याने खळबळ ऊडाली आहे परंतु या नोटीसाठी जणु हवेतच विरल्या कारण यावरही पुढे कुठलीच कारवाई झाली नसल्याचे दिसते.घरकुल न बांधताच नीधी हडप केल्याची बाब या नोटीशीव्दारे तक्रारकर्त्याने ऊपस्थीत केलेला मुद्दा तर दाबायचा नाही ना अशी शंका आता निर्माण होत आहे.

घरकुल न बांधताच जुने घर दाखवुन निधी हडपणारांवर प्रशासन कधी कारवाई करणार?
मंगरुळपीर तालुक्यात काही लाभार्थ्यांनी अधिकार्‍यांशी व सबंधीत कर्मचार्‍यांशी हितसबंध साधत शासनाला चुना लावला आहे.घरकुल मंजुर झाल्यावर जुनेच घर दाखवुन सर्वच्या सर्व हप्ते निधीची ऊचल करुन शासनाला फसवल्याचा प्रकार घडल्याच्या लेखी तक्रार अतुल ऊमाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.या तक्रारीची चौकशी सध्या गुलदस्त्यातच दिसते.दोषींवर गुन्हे दाखल होणार की घेवुन देवुन सेटलमेंट होणार याकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी मंगरुळपीर तालुक्यातील घरकुल तक्रारीची स्वतः चौकशी करावी अशीही मागणी जोर धरत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *