section and everything up until
* * @package Newsup */?> महायुती सरकारला शेतकरी सन्मान निधी चा पडला विसर बळीराजा केडे मात्र दुर्लक्ष. | Ntv News Marathi

लाडका भाऊ योजनेमधे ही केला दुजाभाव अनेक लाडके भाऊ या योजनेपासुन वंचित

छत्रपती संभाजीनगर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या. या योजनेमुळे महिलांना आणि युवकांना विशिष्ट रक्कम दरमहा राज्य सरकारकडून मिळणार आहे. परंतु शेतकरी किसान सन्मान निधी महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अद्याप जमा केले नसल्यामुळे शेतकरीवर्गातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.अशी खंत राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सोयगाव कमेटी चे तालुका उपाध्यक्ष दिलीप देशमुख ( मोरे )यांनी व्यक्त केली दिलीप देशमुख बोलताना असे ही म्हनाले की लाडका भाऊ या योजनेमधे महायुती सरकार दुजाभाव करित असुन या योजनेचा फायदा फक्त बारावी पास किवा या पुढचे शिक्षण घेना-या लाडक्या भावांना या योजनेचा लाभ मिळेल परंतु ज्यांच शिक्षण दहावी, अकरावी किवा त्या पेक्षा कमी शिक्षण झालेल्या तसेच रोज मजुरी करनारे शेतकरी कुटुंबातील गोरगरीब लाडके भाऊ यांना या महायुती सरकार ने लाडका भाऊ योजने पासुन वंचित ठेवलेले आहे या लाडक्या भावांसोबत दुजाभाव करुन त्यांच्यावरती अन्न्याय करुन त्यांना या लाडका भाऊ योजने पासुन अन्न्याय करुन दुर ठेवण्याचे पाप या महायुती सरकार ने केले आहे कुनावरती अन्न्याय होऊनये त्यासाठी ही योजना सरसगट सर्वांसाठी लागु करण्यात यावी असे ही दिलीप देशमुख यांनी सांगितले
केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार याप्रमाणे अनुदान देते. त्याच धर्तीवर शेतकरी किसान सन्मान योजना सुरू करताना केंद्राच्या मदतीमध्ये तेवढाच हिस्सा राज्य सरकारने घालण्याचा निर्णय घेत,अशी मदत शेतकऱ्यांना जाहीर केली. लोकसभा


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने एकत्रित प्रत्येकी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यात जमा केले. मात्र, खरीप पेरणीचे दिवस असल्याने केंद्राने १८ जूनला १८ वा हप्ता जमा केला. राज्य सरकारने त्यांच्या हिश्शाची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही. सध्या शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणीनंतर आता पिकाची खतभरणी, कोळपणी व अन्य नवीन नोंदणी रखडली
तसेच पी. एम. किसान योजनेच्या कामावर कृषी खात्याने बहिष्कार टाकला असून, एक जुलैपासून या योजनेचे काम थांबल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाबाबत माहिती व नवीन नोंदणीचे काम थांबल्यामुळे शेतकरीवर्गला नाहक त्रास सहन करुन हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे ही सांगितले
याच पार्श्वभूमी वर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत देणे गरजेचे असताना, राज्य सरकारने सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण व मुख्यमंत्री लाडका भाऊ, ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र भेटीची योजना जाहीर केली. मात्र, या सर्व योजनांमध्ये सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा सरकारला विसर पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या
लोकसभा निवडणुकीत
जनाधार विरोधात गेल्यामुळे राज्य सरकार पुन्हा सत्तेस्थापनेसाठी सवंग घोषणा करत आहे. राज्य कर्जात असताना सत्ताधारी घोषणा करीत आहेत. मात्र, यापूर्वी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करून नमो शेतकरी सन्मान योजनेची रक्कम बँक खात्यावर जमा करावी.
अशी ही मागणी दिलीप देशमुख, ( मोरे ) योजना जाहीर करत असताना जुन्या जाहीर केलल्या योजनांकडे दुर्लक्ष न करण्याची जबाबदारी शासनाची असते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेचे पैसे वेळेत शेतकऱ्यांना मिळाले तर त्याचा उपयोग शेतीच्या मशागती साठी होणार आहे.
त्या साठी सोयगाव तालुक्यातील किसान सन्मान निधी पासुन वंचित राहिलेल्या सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यामधे ही रक्कम लवकरात लवकर पाठविण्यात यावी अशी ही मागणी दिलीप देशमुख यांनी केली

सोयगाव प्रतिनिधी जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *