माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला मदतीचा हात मृतदेह पोहचविण्यासाठी करुन दिली गाडीची व्यवस्था
GADCHIROLI | अहेरी तालुक्यातील छाल्लेवाडा येथील रहिवाशी जितमल लचीराम धरावत यांच्या घरात काल संध्याकाळच्या दरम्यान काही वाद झाल्यामुळे स्वतःच्या घरात रासायनिक औषध पिऊन आपले जीवन संपविले. त्यांचे नातेवाईकांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते .मात्र त्यांचे अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे दुखत निधन झालं. धरवात घरातील परिस्थिती हलाखिची असल्याची माहिती छाल्लेवाडा येथील कार्यकर्त्यांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना कडळवताच तिथे उपस्थित कार्यकर्त्यांना पाठवून त्यांना शव नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करून देण्यात आली. तसेच पुढील होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमलाही आर्थिक मदत करण्यात आली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरीब व गरजूंना अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार याची ओळख आहे.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी
भास्कर फरकडे, गडचिरोली