कर्जत / जामखेड
कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 238 / 2020 भा द वी कलम 341.324.323.504.506.34 या दाखल गुन्ह्यातील आरोपी 1 1 ) भरत विठ्ठल निंबाळकर 2 ) शत्रुगन विठ्ठल निंबाळकर 3 ) विठ्ठल केरबा निंबाळकर या तिनही आरोपीस कर्जत ता कर्जत जि अहिल्या नगर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्र 1 श्री शेख साहेब यांच्या न्यायालयाच्या निकालाने तीन वर्ष कारावासासह तीस हजार रुपये दंड व सदर गुन्ह्यातील फिर्यादीस वैद्यकीय खर्चापोटी दहा हजार रुपये देणे असा अभुतपुर्व निकाल दिला असल्याने सदर तीन ही आरोपीस कारावास भोगत तीस हजाराचा दंड भरून सदर फिर्यादीस खर्चापोटी रुपये दहा हजार द्यावे लागणार आहेत

गेल्या पाच वर्षापुर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन कर्तव्य दक्ष पोलीस हवालदार / 103 एस डी लोखंडे यांच्या वतीने करत सदर गुन्हयाचे दोषारोप पत्र कर्जत न्यायालयात दाखल करण्यात आले होते .
तर अभियोग पक्षातर्फे ॲडव्होकेट श्री मनोज विष्णु जायभाय यांनी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम पार पाडले तर या कामी कोर्ट पैरवी म्हणून मपोको भंडलकर यांनी चोख कामगीरी बजावली
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124