उमरखेड़ ता प्रतिनिधि
उमरखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपाच्या महिला नगरसेविका करुणा पुंडलिकराव कुबडे यांनी विविध मागण्याचा निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे करुणा कुंडलिकराव कुकडे निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा विडा ताकतीने उचलला तसेच प्रभागातील विविध समस्या सोडवण्याकरिता नागरिकांच्या सोबत संवाद साधताना दिसत आहे
- प्रभाग क्र. 10 मधील सुवर्णपथ रोडवरील मागील पावसाळयापूर्वी नालीची सफाई झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत नालीची सफाई झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
- स्वच्छता मोहीमे अंतर्गत प्रभाग क्र. 10 ची संपूर्ण नाली सफाई करून देण्यात यावी.
- महात्मा फुले वार्ड, टिळक वार्ड, महात्मा गांधी वार्ड, गोचरस्वामी वार्ड, सरदार पटेल वार्ड मध्ये कायमस्वरूपी व नियमित सफाई कामगारांची नेमणुक करण्यात यावी.
- दुचाकी धारक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वरदविनायक श्री गणेश मंदिर उत्तमश्लोक वाचनालय, श्री चिन्मयमूर्ती संस्थान समोर, डॉ. इकबाल उर्दू शाळे समोर, श्री नरहरी महाराज संस्थान समोर, गौसेपाकपिर दर्गाह जवळ श्री नंदु बलदवा यांच्या घरासमोर, शामसेठ बंग यांच्या घरासमोर, अक्षय ज्वेलर्स जवळ तसेच चौभारा गणेश मंदिराच्या मागे, भागवत यांच्या घराजवळ, व श्री सुभाष लुटे यांचे घरासमोर, श्री खडकेश्वर महादेव मंदिर समोर, श्री कृष्णा देशमुख व श्री परडे सर यांच्या घरासमोर रबर मोल्ड गतिरोधक त्वरीत टाकुन देण्यात यावेत.
- उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे व पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याकरीता जुनी गुजरी जैन मंदिर समोरील हातपंप दुरूस्त करून देण्यात यावा.
- म. फुले वार्डातील श्री झांबरे, श्री चिकणे, श्री अन्नदाते यांचे घरातील नळाला दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे सदर भागातील लिकेजेस त्वरीत दुरूस्त करून देण्यात यावे.
प्रभागातील समस्या घेऊन मुख्याधिकारी यांना निवेदन दिले तसेच आपल्या प्रभागासाठी 24 तास समस्या सोडण्याकरिता करुणा पुंडलिकराव कुबडे नेहमी जनतेसमोर दिसत असल्याने त्यांचे कामाचे कौतुक होत आहे हे विशेष
