फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील सकल जैन समाज आणी स्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघाकडुन दि.९ एप्रिल ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा करण्यात आला.सकाळी ८ ते ९-३० पर्यत विश्वशांतीसाठी नवकार महामंञांचा जप करण्यात आला.निमित्त जगभरात विविध ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने विश्वशांती नवकार महामंत्र जप करण्यात आला.
मंगरुळपीर शहरात स्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघ व सकल जैन समाजाच्या वतीने विश्वशांती नवकार महामंत्र जपाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित महिला, पुरुष, युवक-युवतींसह सकल जैन समाजाच्या वतीने सामूहिक विश्वशांती नवकार महामंत्र जप करण्यात आला. यावेळी सकल जैन समाजाचे पदाधिकारी तसेच समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *