फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत ग्राम कारली येथे दिनांक 15/04/2026 रोजी दुपारी 12.30 ते 13.00 वा च्या सुमारास ग्राम कारली येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून ग्राम कारली येथील आरोपी नामे अमर दादाराव राऊत वय 37 वर्ष राहणार कारली तालुका मानोरा जिल्हा वाशिम याच्या राहत्या घरी दोन पंचा समक्ष पोलीस पाटील व सोबत पोलीस स्टाफ च्या मदतीने प्रोव्हिजन रेड केली असता आरोपी याच्या राहते घरी प्लास्टिकच्या सहा ड्रम मध्ये व काही जमिनीमध्ये गाळलेल्या ड्रममध्ये 900 लिटर सडवा मोहमाच किमत 90,000 रु व प्लास्टिकच्या कॅनमध्ये 140 लिटर ग. हा. भा. दारू किंमत 14,000 रु व दारु बनवायचे इतर साहित्य 10,000 रु असा एकूण1,14,000 रु ची प्रोव्हिजन रेड करण्यात आली. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अनुज तारे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक,लता फड उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्रीमान प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिसा नैना पोहकर,पोहेका राधेशाम महले,पोका /424 चेतन भोयर मपोका / 545 कविता गुर्डे व होमगार्ड सैनिक यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *