फुलचंद भगत
वाशिम : महामानव विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण महिला असंघटीत कामगार व कर्मचारी सेनेच्या महिलांची बाईक रॅली काढून महामानवास अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण महिला असंघटीत कामगार/ कर्मचारी सेनेच्या राज्य अध्यक्षा संगीता चव्हाण यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीची सुरुवात सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करुन पाटणी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बुध्द वंदना घेतल्यानंतर अभिवादन व मानवंदना देवून रॅलीचा समारोप केला. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक हक्कांची आणि महिला सक्षमीकरणाची जाणीव करुन देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
असंघटीत क्षेत्रात काम करणार्या महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

सदर रॅलीमध्ये संगिता चव्हाण, संगिता ढोले, शिला घुगे, वनिता अतुल पांडे, सोनू भालेराव, प्रमीला शरद पखाले, माधव कोंडजी गायकवाड, मनोरमा माधव गायकवाड, भिमराव पंढरी गायकवाड, संगीता भिमराव गायकवाड, तृप्ती सज्जनराव गवई, कल्याणी अनिल कांबळे, मिलींद सिताराम इंगळे, रितेश सतीष ठाकरे, ज्योती राहूल कांबळे, धम्मपाल इंगळे, समाधान इंगळे, शालीनी रामदास वैद्य, पोर्णिमा नरवाडे, पुरुषोत्तम कांबळे, सविता राऊत, रमा जमधाडे, सत्यशीला शरद पखाले, लिलाबाई सदाशिव कवडे, माया कुंडलीक मोरे, निताश कांबळे, सिता दुतोंडे, संमिक्षा गवई, शुभांगी दुतोंडे, रोहीनी कांबळे, संघपाल कांबळे, दुर्गा वानखेडे, वर्षा अंभोरे, प्रियंका धनंजय कांबळे, गिता धनंजय कांबळे, सविता राऊत, स्नेहा कांबळे, किरण तायडे, कविता तायडे, संगीता खडसे, जयश्री, रुपाली राठोड, रोशनी कांबळे, आम्रपाली अंभोरे, प्रिती पडघाण, हर्षल पडघाण, किशोर पट्टेबहादुर, मोहीनी पट्टेबहादुर, समय्य इंगळे, उज्वल इंगळे, अक्षय कांबळे, मिलींद सोपान गायकवाड, सोनू बबन गायकवाड, विशाल पवार, निलेश मोरे, रमाबाई सुखदेव पखाले यांच्यासह वाशिम शहर व तालुक्यातील महिलांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
